KOLHAPUR FLOOD UPDATE : महामार्गावर कोणत्याही क्षणी पाणी येण्याची शक्यता

शिरोली एमआयडीसी : सुनील कांबळे

पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे महापुराचे पाणी महामार्गाच्या समांतर आले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला तर कोणत्याही क्षणी महामार्गावर पाणी येऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. महामार्गावर युद्ध पातळीवर रुंदीकरण करण्यात येत असून, यामुळे वाहतुकीची काही प्रमाणात कोंडी निर्माण झाली आहे.

महामार्गावर पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मात्र २०१९ व २०२१ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. बुधले मंगल कार्यालयासमोर सध्या रस्त्याच्या समांतर पाणी आले आहे.

२०१२ रोजी असेच पाणी वाढत येऊन रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर पाणी आले होते. त्यानंतर महापुराच्या विळख्यात महामार्ग सापडून जवळ जवळ चार दिवस महामार्ग पुर्णतः ठप्प झाला होता. महामार्गावर पाणी येऊन रस्ता बंद होईल अशा भितीने वाहनधारक आपल्या इच्छित स्थळी जाण्याची घाई करत आहेत.

2024-07-27T12:47:58Z dg43tfdfdgfd