KALAMBOLI HOSPITAL NEWS | कळंबोलीच्या ‘अमर’ रूग्णालयाचा परवाना रद्द

पनवेल : विक्रम बाबर

कळंबोली येथील अमर रुग्णालयात फेब्रवारी आणि जुलै महिन्यात उपचारा दरम्यान पीडीतेचा मृत्यू झाल्याने नवीन रुग्ण दाखल करुन घेऊ नये, अशा सूचना पालिकेने केल्या होत्या. मात्र सूचनांचे पालन डॉ.अर्जुन पोळ करत नसल्याचा ठपका ठेवत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार अमर रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

अमर रुग्णालयात 18 फेब्रुवारी रोजी साबरीन अजमल खान (वय 25) या गरोदर महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता.त्या अनुषंगाने पालिका स्तरावरील गठित करण्यात आलेल्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या बैठकीमध्ये निष्काळजीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्याच बरोबर 6 ते 9 जुलै दरम्यान मावळ तालुक्यातील गर्भवती महिला समरिन निसार नेवरेकर (वय 25, राहणार वराळे) हिला गर्भपात करण्याची तक्रार कळंबोली येथील अमर हॉस्पिटलबद्दल पालिकेकडे आली होती.त्यांचाही मृत्यू झाला होता.

रोग प्रतिबंधात्मक रुग्णालय | पुढारी

या प्रकरणी अमर रुग्णालय व्यवस्थापनाकडून बर्याचशा कायदेशीर बाबीं, नियम व मानकांची पुर्तता होत नसल्याने या रुग्णालयाने पुढे अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आंतररुग्ण विभागात नवीन रुग्ण दाखल करुन घेण्यास पालिकेने प्रतिबंध घातले होते. मुंबई नर्सिंग होम कायद्यानूसार या रूग्णालयाची नोंदणी रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Thane News | ग्रामीण आरोग्य केंद्रे कात टाकणार

याबाबत चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त ांच्या समोर 10 जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली होती. तरी देखील रुग्णालयाने रुग्ण भरती केली होती.तसेच अमर रूग्णालयाचे संचालक डॉ. अर्जुन पोळ यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याबाबत महाराष्ट्र वैद्यकिय परिषद ( महाराष्ट मेडिकल कौन्सील) यांच्याकडे लेखी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.

2024-07-27T07:56:18Z dg43tfdfdgfd