GOA NEWS|कमिशन घेतलेल्या आमदारांची नावे जाहीर करा

फोंडा ः कंत्राटदारांकडून कमिशन घेतलेल्या आमदार, मंत्र्यांची नावे खासदार विरिएतो फर्नांडिस यांनी लगेच जाहीर करावीत, असे आव्हान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले. पाटणतळी-बांदोडा येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी खासदार विरिएतो फर्नांडिस यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, बालीश विधाने करून लोकांत संभ्रम निर्माण करू नका, असे स्पष्टपणे सांगितले.

Goa Crime News | दिल्लीच्या पर्यटकाचा गोव्यात खून

फोंड्यातील गणपती दर्शनावेळी खासदार विरिएतो फर्नांडिस यांनी फोंडा तसेच राज्यातील निकृष्ट रस्त्यांच्या प्रश्नासंबंधी बोलताना संबंधित कंत्राटदारांकडून आमदार, मंत्री कमिशन घेतात, त्यामुळेच रस्ता कमी दर्जाचा होतो, असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना मंत्री ढवळीकर यांनी कोण कमिशन खातो त्यांची नावे जाहीर करा, असे आव्हान विरिएतो फर्नांडिस यांना दिले आहे.

मंत्री ढवळीकर म्हणाले, एखाद्यावेळी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करायच्या अगोदर बर्‍याचदा आमदारांना संबंधित कंत्राटदाराला स्वतःकडील पैसे आगाऊ दिले जातात, कारण काम वेळेत पूर्ण व्हायला हवे. अर्थातच पैसे मिळाल्यानंतर कंत्राटदार हे पैसे परत करतो, पण लोकांना चांगले आणि वेळेत काम होण्यासाठी आमदारांना पदरमोड करावी लागते.

खासदार विरिएतो फर्नांडिस हे राजकारणात नवीन आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोलावे. काही पुरावे असल्यास त्यांनी त्यासंंबंधी जाहीरपणे बोलावे पण बिनबुडाचे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. विरिएतो फर्नांडिस यांनी लष्करी राजवट लावावी असेही विधान केले होते, त्याला अनुसरून बोलताना मंत्री ढवळीकर यांनी ज्यांनी लष्करी सेवेत काम केेले त्यांना लष्करी सेवेचे नियम आणि कायदे माहीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

गरजेसाठी काँग्रेसकडून कुणाचाही वापर...

काँग्रेस पक्षाच्या गोव्यातील पदाधिकार्‍यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून इतर पक्षात गेलेल्यांना पुन्हा तिकीट देणार नाही, असे जाहीर केले होते. त्याला अनुसरून बोलताना सुदिन ढवळीकर यांनी हरियाणा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा सन्मानाने बोलावून तिकीट दिल्याचे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसकडून गरज भासल्यास कुणाचाही वापर होतो. आपण मागील 25 वर्षे मगो पक्षात आहे, त्यामुळे आपणच यावर बोलू शकतो, असे स्पष्ट केले.

Goa News : ‘पेज थ्री’चे निर्माता, दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी केली ११ चित्रपटांची घोषणा

2024-09-16T01:51:06Z dg43tfdfdgfd