Trending:


Lok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्ज

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असेलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसल्याचं दिसतंय. मुंबईतील सहा मतदारसंघांतील मतदान संख्येची आकडेवारी (Mumbai Lok Sabha Election Total Voting List) समोर आली असून त्यामध्ये मुंबई उत्तर लोकसभेमध्ये एकूण मतदारांची संख्या सर्वाधिक असून ती 18.12 लाख इतकी आहे. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजे 14.74 लाख मतदान आहे. मुंबई लोकसभानिहाय आकडेवारी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 9 लाख 68 हजार 983 महिला मतदार- 8 लाख 42 हजार 546 तृतीयपंथीय मतदार- 413 एकूण मतदार- 18 लाख 11 हजार 942 मतदान केंद्र- 1 हजार 702, संवेदनशील मतदान केंद्र- 30 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 9 लाख 38 हजार 365 महिला मतदार- 7 लाख 96 हजार 663 तृतीयपंथीय- 60 एकूण मतदार- 17 लाख 35 हजार 88 मतदान केंद्र- 1 हजार 753 संवेदनशील मतदान केंद्र- 21 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 8 लाख 77 हजार 855 महिला मतदार- 7 लाख 58 हजार 799 तृतीयपंथीय - 236 एकूण मतदार- 16 लाख 36 हजार 890 मतदान केंद्र- 1 हजार 682 संवेदनशील मतदान केंद्र- 32 मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 9 लाख 41 हजार 288 महिला मतदार- 8 लाख 2 हजार 775 तृतीयपंथीय- 65 एकुण मतदार- 17 लाख 44 हजार 128 मतदान केंद्र- 1 हजार 698 संवदेनशील मतदान केंद्र - 30 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 7 लाख 87 हजार 667 महिला मतदार- 6 लाख 86 हजार 516 तृतीयपंथीय मतदार- 222 एकूण मतदार- 14 लाख 74 हजार 405 मतदान केंद्र- 1 हजार 539, संवदेनशील मतदान केंद्र- 0 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ पुरुष मतदार- 8 लाख 32 हजार 560 महिला मतदार- 7 लाख 3 हजार 565 तृतीयपंथीय मतदार- 43 एकुण मतदार- 15 लाख 36 हजार 168 मतदान केंद्र- 1 हजार 530 संवदेनशील मतदान केंद्र - 11 मुंबईत 22 हजार पोलिस तैनात बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.


करोना लशीची नवी दहशत

जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून गवगवा झालेल्या भारतात, ‘कोव्हिशील्ड’ लशीचे साधारणतः १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचले आहेत. त्यामानाने त्याचे जे काही दुष्परिणाम दिसले, ते नगण्य संख्येत होते; त्यामुळे ही लस आपल्या दृष्टीने संजीवनीच म्हणावी लागेल.


Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख केलाय..तर मविआचे नेते फक्त शिव्या देतात अशी टीका फडणवीसांनी केलीय.. Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले... Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024 CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान


उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या …


Weather update : महाराष्ट्राला हवामान विभागाकडून हायअलर्ट; पावसाबाबत मोठी बातमी

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी इतका असून शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास दिवसभर शहरात उष्णतेची लाट राहिल मात्र त्यानंतर सध्यांकीळ मघेगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईतील तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आज आणि उद्या पुणे शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. पुढील दोन तीन दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार आहे.


दारी कुरिअर येता...

निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांमधून आणि मुलाखतींमधून जे काही सांगितलं जातं, ते वस्त्रगाळ केलं तर खाली किती सत्व पडेल आणि वर काय सत्य उरेल, हे कोणालाच सांगता येत नाही. परतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा भूतकाळ उकरून जो सत्याचा प्रकाश पाडला त्या प्रकाशात पाहिलं तर एक प्रसंग डोळ्यांपुढे येतो... गृहिणी- अहो हे काय केलंत? त्याला कशाला बसवता ख...


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


वाचाळांना आवरा!

देशावर दीर्घकाळ सत्ता गाजवणार्‍या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना झाले आहे तरी काय, असा प्रश्न पडावा अशी आजची स्थिती आहे. देशात निवडणुकीचा ज्वर टिपेला असताना मतांच्या ध्रुवीकरणासाठी जणू स्पर्धाच लागली आहे! ती इतक्या टोकाला गेली आहे की, आपण कोणत्या बाजूचे आहोत वा कोणाचे मीठ खात आहोत, याचे साधे भानही कोणाला राहिल्याचे दिसत नाही. त्या नादात पाकिस्तानचे उघड …


मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

मुंबई : महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात उद्या 20 मे रोजी मतदान होत असून मुंबईसह परिसरातील एकूण 13 मतदारसंघात निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय नेतेमंडळीही कामाला लागली आहे. मुंबईतील (Mumbai) 6 जागांवर महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार फाईट आहे. त्यामुळे, प्रत्येक हालचालीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची नजर आहे. त्यातच, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी ऐन मतदानाच्या...


VIDEO | मविआचे 6 पैकी 6 उमेदवार मराठी

Mumbai Loksabha Election MVA Candidate


ABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य ((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, महामुंबईच्या महामुकाबल्याकडे सर्वांचं लक्ष...आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचा कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) दिल्लीत आम आदमी पक्षाचं आंदोलन सुरु. अरविंद केजरीवाल भाजप कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासून आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू पुणे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, जमावानं बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं मान्सून आज अंदमानात दाखल होणार तर दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल. ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज ((मान्सून आज अंदमानात धडकणार))


भूगोलाचा इतिहास : दंतकथा बनलेला इंजिनीअर

आधुनिक भारताला आकार देणाऱ्या थोर विभूतींपैकी एक भारतरत्न इंजिनीअर डॉ. एम. विश्वेश्वरैया भारतमातेचे केवढे महान सुपुत्र होते हे अभ्यासानंतरच कळते.


Superfast News | राजकीय वर्तुळापासून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेपर्यंत ; पाहा सुपरफास्ट बातम्या

Superfast News maharashtra news mumbai ghatkopar hoarding accident


Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?

ठाणे : शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झाले. राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तेथे त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. राज ठाकरे यांची श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचताच नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात पोहचले. यामुळे शिवसैनिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती.


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


ध्रुवीय प्रकाशाची आगळी अनुभूती

Aurora Borealis : वादळे जीपीएस, दळणवळण आणि कृत्रिम उपग्रहांशी संपर्क ठेवणाऱ्या यंत्रणेत अडथळा निर्माण करू शकतात. परंतु या ताज्या वादळाने कुठलाही व्यत्यय येणार नाही, असा अंदाज ‘नोआ’तील शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.


दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत २४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव सुनील राजपूत असून तो एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा.