CENTRAL RAILWAY : नाहूर - मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वे उशिराने

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : आधीच पावसामुळे वेळापत्रक कोलमडलेल्या लोकल फेऱ्यांच्या विलंबामुळे प्रवासी त्रासलेले असताना बुधवारी रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दोन रुळ जोडणीच्या ठिकाणी तडा गेल्याने धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. दुसरीकडे, कांदिवली रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून उतरताना झालेल्या अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक देखील मंदावली होती.

रेल्वे रुळाला तडा

नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दोन रुळ जोडणीच्या ठिकाणी तडा गेल्याने धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. बिघाड दुरुस्तीनंतर पहिली लोकल १०.५० च्या सुमारास रवाना झाली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लोकल ३० किमी प्रति तास वेगाने धावत आहेत. दरम्यान बिघाडामुळे लोकलच्या लांब लचक रांगा लागल्याने लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. बिघाडाची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी एक्सवरून दिली. स्थानकादरम्यान रखडलेल्या लोकलमध्ये उद्घोषणा करण्यात येत आहे. बिघाडामुळे रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

Due to some Technical faults between Nahur and Mulund Station Down Local line some locals are running behind Schedule time.

We are continuously working on it to resolve the same as early as possible. Inconvenience is highly regretted.

— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 3, 2024 ]]>

प्रवासी रेल्वेतून उतरताना फलाटाखाली आला

दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर बोरिवलीकडे जाणाऱ्या धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करताना प्रवासी स्थानकातील लोकलमधील पायदान आणि फलाट यांच्या पोकळीत अडकला. कांदिवली स्थानकात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. लोकलच्या पहिल्या डब्यातील चाकाखाली प्रवासी आल्याने सुमारे अर्धा तास लोकल खोळंबली होती. पावणे दहाच्या सुमारास लोकल बोरिवलीसाठी रवाना झाली. दरम्यान यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या.

दरम्यान, मागील जवळपास महिन्याभरापासून मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल उशिराने धावत आहेत. सकाळी कामावर जाताना यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेवरील अनेक लोकल कर्जत, खोपोली, बदलापूरवरुन सुटणाऱ्या लोकल तब्बल ४० ते ४५ मिनिटांहून अधिक उशिराने धावतात. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. सकाळी तसंच दुपारीच्या वेळतही लोकल विलंबाने धावत आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T18:38:31Z dg43tfdfdgfd