BOMB THREAT IN AHMEDABAD SCHOOL: दिल्लीनंतर अहमदाबादमधल्या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांना भरली धडकी

Bomb Threat In Ahmedabad School: दिल्ली -NCR प्रमाणे अहमदाबादच्या वेगवेगळ्या शाळांना धमक्यांचे ईमेल पाठवण्यात आले आहेत. या ईमेलद्वारे बॉम्बने शाळा उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने याविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची टीम बॉम्ब शोध पथकासह शाळेमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे.

(bomb threat emails sent to some schools of ahmedabad)

ज्या शाळांना धमकी देण्यात आली आहे त्यामध्ये बोपल स्थित डीपीएस, आनंद निकेतनसह साधारणपणे 6-7 शाळांचा समावेश आहे. अहमदाबादच्या शाळांना आलेले ईमेल हे दिल्लीमध्ये आलेल्या मेलच्या पॅटर्नप्रमाणेच आले आहेत. या ईमेलचे डोमेन देशाबाहेरचे असल्याची माहिती मिळाली आहे. रशियन सर्व्हरवरुन ही धमकी मिळाली आहे. सध्या मुलांना उन्हाळी सुट्टी असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार नाही. पण लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान असल्याने पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

2024-05-06T07:25:09Z dg43tfdfdgfd