Trending:


Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...

Rakhi Sawant Health Updates : राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. मात्र, तिचा पूर्व पती रितेशने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. राखीला...


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


चाबहारची बहार!

इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद मोहंमद खातमी यांनी 2003 मध्ये केलेला भारत दौरा हा भारत-इराण संबंधांना ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरला. त्यावेळी उभय देशांत विविध क्षेत्रांतील करार झाले; परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा होता, तो चाबहार बंदरविषयक करार. मात्र त्यानंतरच्या काळात भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला, तर इराण व अमेरिकेतील वैमनस्य वाढत गेले. त्यामुळे चाबहार बंदराच्या विकासाची प्रक्रिया मंदावली. …


तपास यंत्रणांना धडा

मात्र, ही बातमी येण्याआधीच सन २०२१ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून पैसा मिळत असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा आणि नंतर न्यायालयातही पुरकायस्थ हे सातत्याने ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून एक छदामही मिळालेला नाही,’ अशी भूमिका सातत्याने मांडत आहेत.


Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला

Girish Mahajan नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भुजबळांच्या भेटीनंतर गिरीश महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला. गिरीश महाजन म्हणाले की, आता कुठली नाराजी आहे. मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तटकरेंची चिंता देशमुखांनी करू नये सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, असा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का? तुम्ही तिकडे राहा नाहीतर अजून काही वेगळे विचार तुमच्या मनात


Central Railway Special Blocks: मध्य रेल्वेचा 15 दिवसांचा विशेष ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल अन् लोकल सेवेवरही परिणाम

Mumbai Train Special Block from May 17 to June 2: मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे. हा विशेष ब्लॉक 17 मे ते 2 जून असा 15 दिवस सुरू असणार आहे. जाणून घ्या या ब्लॉकमुळे कोणत्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


उद्धव ठाकरेंचा मोदी, फडणवीस, शिंदेवर हल्लाबोल

, ,


Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या नातेवाईकाचे निधन

Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding Accident) 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावावे लागले. या घटनेने बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात कार्तिकच्या नातेवाईकांना प्राण गमवावे लागले. मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले....


ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2024

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2024 मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार , सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार ११ मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती


Pune News: पतीने पत्नीच्या गुप्तांगाला लावलं कुलूप, चावी सापडेना; पुण्यातील घटना

गोविंद वाकडे, पिंपरी - चिंचवड : विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप...


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

बेळगाव : बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेला असून सीमाभागातील मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाबद्दल आकर्षण आणि आदर आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी 40 हून अधिक जंगी आखाडे भरतात. मात्र सर्वच मोठ्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान विरुध्द उत्तर भारतातील मल्लांशी असते. महाराष्ट्र केसरी वि. कर्नाटक केसरी अशी जोड होण्यासाठी 30 वर्षांपासून प्रतीक्षा आहे. …


Marathwada Water Crisis: मराठवाड्यात भीषण 'पाणीबाणी', तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

Marathwada Water Crisis: सध्या हिंगोलीसह मराठवाड्यातील तब्बल एक हजार ६४८ गाव व वाड्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, या गावांना एक हजार ७५८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाडा आणि पाणीटंचाई असे गेल्या काही वर्षांपासून समीकरण झाले आहे.


Sharad Pawar Sabha Hoarding Collapse : शरद पवारांच्या भाषणावेळीच कोसळले स्टेजवरचे होर्डिंग

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनाही या अवकाळी व बदलत्या हवामानाचा फटका बसल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काही नेत्यांच्या सभाही अवकाळीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना झाली. आता, पुन्हा एकदा बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा (Nashik) सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. मात्र, तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं. मात्र, यावेळी, व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.


India Alliance BKC Rally : मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सांगता सभा ABP Majha

Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. अशातच 20 मे रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईचाही (Mumbai News) समावेश आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये (Mumbai Lok Sabha Constituency) मतदान प्रक्रिया (Voting) पार पडणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबईत आज महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीच्या (India Alliance) प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडणार आहे. मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.


Monsoon Update : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी, हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

मान्सूनबाबत दिलासादायक बातमी आहे. यावर्षी देशात पवासाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, मान्सूनच आगमण देखील वेळेत होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा 31 मे रोजीच केरळात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर साधारणपणे सात जून रोजी मान्सूनचं तळकोकणात आगमण होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून उशिरानं दाखल झाला होता, आकरा जूनला मान्सूनचं महाराष्ट्रात आगमण झालं होतं. मात्र यावेळी सात जूनलाच मान्सून राज्यात दाखल होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. राज्यात 106 टक्के इतका पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यंदा हवामान विभागाकडून मान्सूनबाबत समाधानकारक अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, शेती मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान दुसरीकडे अजूनही काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार आहे. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेजं अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.


Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.


पावसाची गॅरंटी

Monsoon 2024: ​​साधारण मे महिन्याच्या मध्यावर मान्सूनच्या आगमनाचा एक अंदाज जाहीर होत असतो; तो तसा बुधवारी जाहीर झाला. त्या अंदाजानुसार, केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. ही तारीख चार दिवस इकडे-तिकडे होऊ शकते.


मुंबई : वडाळा दुर्घटनेच्या चौकशीचा निर्णय

वडाळ्यात वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी टॉवर कोसळल्याच्या घटनेची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे.


Pm Modi Rally Mumbai : मोदी-राज सभेचे पडसाद, दोन मुंबईकर मित्र एकमेकांत भिडले

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. तसेच, आज सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. महायुतीच्या सभेची सांगता मोदींच्या भाषणानं मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील मात्र प्रश्न हा आहे की, मुख्य भाषणाची आणि शेवटच्या भाषणाची संधी कुणाला मिळणार? तर दुसरीकडे मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना शेवटचं भाषण करता येणार नाही.


Loksabha Election | अपमान झाला म्हणून लोकसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Loksabha Election chhagan bhujbal nashik


Rajan Vichare Full Speech Thane : ठाण्याची जनता मला तिसऱ्यांदा निवडून देतील, राजन विचारेंना विश्वास

Rajan Vichare Full Speech Thane : ठाण्याची जनता मला तिसऱ्यांदा निवडून देतील असा विश्वास ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, "आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे." हे व्हिडिओ देखील पाहा! Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा 4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. पुढे नितेश कराळे मास्तर म्हणाले की, "मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरताना 3 कोटी रूपये संपत्ती असल्याचं सांगितलं. 3 कोटी रुपयांचे कोणी फकीर असतो का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे कराळे मास्तर यांनी देशातील हायवेवरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "01 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 18 कोटी खर्च येतो तर मोदींना त्यासाठी 251 कोटी खर्च केले" असा लेखाजोखा देखील त्यांनी यावेळी मांडला.


RTE admission 2024: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा, 17 मेपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज

RTE admission 2024: राईट टू एज्यूकेशन कायद्यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या स्थगितीनंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती.


Uddhav Thackeray Exclusive : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील : उद्धव ठाकरे

मुंबई: भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली....