बातम्या

Trending:


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


NEET PG 2024 revised dates: नीट- पीजी परीक्षेच्या नव्या तारखा मंगळवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

NEET PG 2024: इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.


UCO Bank Recruitment: परीक्षा न देता बँकेत नोकरी, युको बँकेने 'या' पदांसाठी मागवले अर्ज

UCO Bank Apprentice Recruitment 2024: युको बँकेत एकूण ५४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.


Manoj Jarange Rally : मनोज जरांगेंची आजपासून 13 जुलैपर्यंत शांतता रॅली

आज सकाळी मनोज जरांगे पाटील हिंगोलीतील शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. साधारणतः सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या साहाय्यानं 30 फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हरानं त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होईल आणि दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होईल. रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांच्या भाषणानं होईल. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषदही घेणार आहेत.


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Ajit Pawar on Jayant Patil : जयंतराव, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला मी तयार

Ajit Pawar on Jayant Patil : जयंतराव, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला मी तयारजयंत पाटील यांनी अजित दादांच्या अर्थ संकल्पवर कवितेतून टीका केल्यानंतर अजित दादांनी देखील कवितेतून उत्तर दीले एवढं लक्षात ठेवा हे हे कवितेचे शीर्षक आहे कवितेतून जयंत पाटील याना टोला तुम्ही केलेल्या आरोपात काही तथ्य नाही जयंत पाटील हल्ली खूप शायरी करू लागलेत त्यामुळे मला देखील त्यांना उत्तर द्यावे लागेल शायरीतून अजित दादा यांचा जयंत पाटील याना पुन्हा टोला हल्ली सर्वांना वारीत चालावे असे वाटते त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे जयंत राव येतील असे मला वाटत नाही ते आले तर मी मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे काही काही लोकांना फक्त व्हिडीओ काढायचा उद्योग आहे काढायचे व्हिडीओ आणि टाकायचे महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका...कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा तुम्हाला ऑगस्ट मध्ये देखील पैसे आले तरी 1 जुलै पासून मिळतील रांगा लागू लागल्याने आम्ही अर्ज भरायची मुदत देखील वाढवून दिलीय पृथ्वीराज बाबा तुम्ही म्हणालात 1500 रुपये कसेल देता 5 हजार द्या अरे बाबा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा दमडीही दिली नाही बाबा सांगतात आम्ही केंद्रात आलो असतो तर महिना साडे आठ हजार देऊ जर एवढं द्यायचं झालं तर अडीच लाख कोटी लागतील अरे आपल बजेट किती अजित पवार शब्दाचा पक्का आहे हा अजित दादांचा वादा आहे कधी खोटं बोलत नाही केंद्रातील योजना असली तरी हिशोब काढा 25 लाख कोटी लागतील काहीही पण न पटेल असे 2003 आणि 2004 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते यांनी मोफत बिल ची घोषणा केली एकदा दीले आणि म्हणाले ही चूनावी घोषणा आहे आम्ही तेव्हा दुसऱ्या रांगेत बसायचो त्यामुळे फार काही चालत नव्हत आम्ही 9 हजार मेगा व्हॉट सौर वीज तयार करत आहोत..


TOP 25 News | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 06 Jully 2024 ABP Majha

रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा, सत्यमेव जयते, वायकरांची माझाला प्रतिक्रिया. आता फक्त दाऊदला क्लीनचीट द्यायचं बाकी, वायकरांच्या क्लीनचीटवरुन संजय राऊतांचा घणाघात, तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंगमशीनमध्ये धुतलं जात, पटोलेंचा टोला. रवींद्र वायकरांच्या क्लीनचीटवर किरीट सोमय्यांचं नो कमेन्टस, प्रकरण कोर्टात म्हणत सोमय्यांनी बोलणं टाळलं. हिंगोलीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जरांगेंची १३ जुलैपर्यंत शांतता रॅली, १३ जुलैनंतर भूमिका ठरवणार.. ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी बैठक, ४५ पक्षांच्या नेत्यांना बैठकीचं निमंत्रण. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षीसावरुन विरोधकांचा हल्लाबोल, राज्याच्या तिजोरीत खडखडाट, मग बक्षीस देण्याची गरज काय? विरोधकांचा सवाल. पुण्यात कायद्याचं भय उरलं नाही, ड्रंक अँड ड्राइवच्या कारवाईदरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक... बीडमध्ये धावत्या दुचाकीवरुन सेल्फी घेणं पडलं महागात, एकाचा मृत्यू, अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद. नीटचं कौन्सिलिंग अनिश्चित काळासाठी लांबणीवर...पेपरफुटीच्या घटनानंतर सरकारचा निर्णय सोमवारी राहुल गांधी मणिपूरला जाणार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनल्यानंतर पहिल्यादांच मणिपूर दौरा. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचं नीरा नदीत स्नान, तर तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीत मुक्काम


भूगोलाचा इतिहास : असाही एक ‘वायुदूत’

आपल्याकडे वायू हा पंचमहाभूतांपैकी एक मानला असून वायुदेवतेचा उल्लेख वेद, महाकाव्ये, पुराणे व अनेक दंतकथा आणि काव्यात आहे.


मराठा आरक्षण : जरांगेंच्या विधानावर समांतांचं वक्तव्य

Uday Samant On Manoj Jarange Patil Remarks On Election


Mumbai railway megablock : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai local train Mega block news : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीची कामे आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावे लाटल्या, सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय, वडेट्टीवारांची सरकारवर टीका लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली. पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत.


बुद्धीचा तो लोप

स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वयाच्या साधारण ५७व्या वर्षानंतर असते. अलीकडे मात्र हा आकडा ‘वर’ आला आहे. अगदी तरुण मुलांना, लहान मुलांनाही विस्मरण होण्याच्या घटना बघायला मिळतात. कमी वयात साध्या-साध्या गोष्टी सहजपणे विसरणे अनेक संशोधनातून आढळून आलेले आहे. हे इंटरनेटच्या अतिवापरामुळे घडते आहे का?


पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करतात?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळेंचा संताप, रोहित पवारांचाही सवाल

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे (Pune) शहरात आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात आणि ड्रग्जप्रकरणावरुन पुणे शहर टार्गेटवर असताना, एका महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून गृहमंत्री आणि पालमंत्र्यांना प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे ही क्राइम कॅपिटल...


Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


Book Review : जगाचे पोट भरणारा शास्त्रज्ञ

leon hesser biography : खराब रस्ते, कृषी संशोधन केंद्रेही तशीच, अशा विपरीत परिस्थितीत बोरलॉग यांनी कृषिसंशोधन कसे केले? अन्नधान्य उत्पादन कसे वाढवले? त्यासाठी काय-काय प्रयत्न त्यांना करावे लागले? या सगळ्याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.


Ratnagiri Barsu : वाडीखुर्द गावातील 308 एकर जमीनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर

Ratnagiri Barsu : वाडीखुर्द गावातील 308 एकर जमीनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर कोकणात रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसु गावापासून 5 किमी अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित वाडीखुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजे 308 एकर जमीनिच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरील क्षेत्राचा समावेश सरकारच्या अधिसूचनेनंतर स्थानिक पातळीवर अनेक चर्चाना सुरुवात हेही वाचा : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीपासून सुरुवात होत आहे. मराठा ताकदीने एकत्र येणार आहे. आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील. त्यांनी याआधीही असे केले आहे. आमच्या पुढे आंदोलन करणे, सभा घेणे. आम्ही जे करत आहोत तेच करणे. मात्र, परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, अशी टीका त्यांनी यावेळी छगन भुजबळांवर केली आहे. शांतता रॅली सुरू असली तरी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहेत. 123 जागा शोधल्या आहेत. पाचव्या टप्यात मुंबईत रॅली काढणार आहे. फडणवीस म्हणतात काँग्रेसने आरक्षण दिले नाही, त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्ही द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.


आज डब्यात काय द्यावे?

शाळा सुरू झाल्या आणि डब्यात काय द्यायचे, हा प्रश्न आईसमोर निर्माण झाला. रोजच्या पोळी- भाजीला मुले कंटाळतात, त्याची तक्रार करतात आणि मग डबा परत आणतात. डबा आवडता नसेल, तर मित्रांमध्ये वाटणे किंवा मुद्दाम सांडवणे, कुठे तरी विसरणे असेही प्रकार घडतात. मुलांना डबा देताना काय आवर्जून करावे, काय टाळावे, डब्यात विविधता कशी असावी याबाबतची ही माहिती. यासाठी पाच ते दहा या वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे.


maratha reservation : जरांगेची हिंगोलीतून जनजागृती रॅली सुरू होणार

maratha reservation : Jarange marathwada rally


Big Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत

OBC, SEBC आणि EWS संवर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थींना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत मिळणार आहे.


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


Majha Vitthal Majhi Wari : माऊलींच्या पादुकांचं निरास्नान; दौंडवासियांकडून अन्नदानाची सोय

Majha Vitthal Majhi Wari : माऊलींच्या पादुकांचं निरास्नान; दौंडवासियांकडून अन्नदानाची सोय माऊली महाराजांची पालखी आज सकाळी वाल्हे वरून निघाली आणि आजचा मुक्काम हा लोणंद मध्ये असणार आहे.. नीरा स्नानाला जाण्यापूर्वी माऊली महाराजांची पालखी ही पालखी तळावर ठेवण्यात आली त्यावेळी मीरा पंचक्रोशीतील लोकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.. सकाळपासून लोक पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभा होते.. याच पालखीतळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी हेही वाचा : रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..