Trending:


Pm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

मुंबईतल्या महायुती आणि इंडिया आघाडीच्या सभेतून एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. तर असली नकली शिवसेनेवरुन नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा वार-प्रतिवार रंगला. तर शरद पवार यांनीही नकली शिवसेनेच्या टीकेवरुन मोदींना टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरेंनी देखील सडकून टीका केली "बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही, पण गद्दाराच्या कार्ट्याला उमेदवारी देता. ज्या प्रमोद महाजनांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. पूनम तुमच्या पक्षात असली तरी प्रमोद महाजन आणि माझे भावासारखे संबंध होते", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे आपण जमलो आहेत. दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. सगळे बेअकली आणि नकली आहेत. 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण 4 जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे 4 जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे.


ABP Majha Headlines : 07.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. भटकती आत्माच्या टीकेवरुन शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल. ४ जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे, पवार तुरुंगात जाणार, बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघआात, मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार ((अमित शाहांचा आज अमेठीत रोड शो))


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्या रॅलीत घुसून तरुणाने मारली कानाखाली, VIDEO

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. पाचव्या टप्प्यात आता मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार हे प्रचार करत होते. यावेळी गर्दीमध्ये घुसून आलेल्या 2 तरुणाने कन्हैयाकुमार यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये नंदननगरी परिसरामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार प्रचार करत होते. आपल्या...


Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

Mumbai Tempreture: सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत येणारा प्रचंड उकाड्याचा आणि उष्ण हवेचा अनुभव सोमवारी कायम असेल असाही अंदाज आहे.


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


Loksabha election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

CM Eknath Shinde Serious Allegation On Uddhav Thackeray


पक्ष्यांचे जीवनमान बदलतेय!

भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये जंगलांत आगी लागण्याच्या 342 घटना देशभरात घडल्या. याचा फटका पक्ष्यांना बसला आहे. याचे कारण मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. गेल्या काही वर्षांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे जीवनमान बदलत आहे. खासकरून उत्तरेकडील थंड देशातून उष्णकटिबंधीय प्रदेशात येणार्‍या प्रवासी पक्ष्यांना तापमानवाढीची झळ बसली आहे. याचे कारण प्रवासी …


मूळ शिवसेनेसोबत राहिलो, म्हणून तिसऱ्यांदा खासदार होणार, संजय जाधवांचा आत्मविश्वास सातव्या आस्मानावर

'मूळ शिवसेनेसोबत राहिल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मूळ शिवसेनेत राहिल्यामुळेच मी आज तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येत आहे. जर मी शिवसेना सोडली असती तर मी मोठ्या फरकाने या लोकसभा निवडणुकीमध्ये हरलो असतो.' असा ठाम विश्वास संजय जाधव दर्शवला आहे.


Supreme court on election commission: मतदान आकडेवारीवर तातडीने सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाची सहमती

Supreme court on election commission: स्वयंसेवी संस्थेने आपल्या सन २०१९ च्या जनहित याचिकेत अर्ज दाखल करून निवडणूक आयोगाला सर्व मतदान केंद्रांच्या ‘फॉर्म १७ -सी’ भाग-१च्या स्कॅन केलेल्या प्रती मतदानानंतर अपलोड करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.


Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारी बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहेत. आजच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडतायेत हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी


Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...

Rakhi Sawant Health Updates : राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. मात्र, तिचा पूर्व पती रितेशने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. राखीला...


Nagpur Crime : मेट्रो स्थानकांवरून नागपूरकरांच्या सायकलींची चोरी, सायकलचोर पोलिसांच्या ताब्यात

Nagpur Crime : नागपूरकरांनी मेट्रोनेच प्रवास करावा, यासाठी महामेट्रोकडून सायकलने या आणि मेट्रोने प्रवास करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, सायकलने आलेल्या प्रवाशांच्या सायकल चोरीला जात असल्याच्या घटना वाढत चालल्याचे दिसून आले.


विशाल पाटलांचा संजयकाका पाटलांवर निशाणा

VISHAL PATIL ON SANJAY KAKA PATIL NEWS


Sharad Pawar: शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला अजितदादांच्या शिलेदाराची भेट; चर्चांना उधाण

Sharad Pawar Sunil Tatkare: शरद पवारांचा मुक्का असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरेंनी भेट दिल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे आमदार अनिल देशमुखांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


Raj Thackeray Speech : मोदींसमोर तोफ धडाडली, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech : येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडका लावण्यात आला. शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची देखील उपस्थित होती. कारण मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पुणे, कोकण, कल्याण-डोंबिवली आणि आता मुंबई अशा महत्त्वाच्या...


Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

Maharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.