Trending:


MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

मुंबई: ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र पाठवले आहे. वरळी येथील बीडीडी चाळ परिसरातील झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना तातडीने भरीव आर्थिक मदत करावी,अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 1 जुलैला वरळीतील गांधी मैदान रोड लगतच्या बीडीडी चाळ क्र. ८९ जवळील गूळभेंडीचे झाड अंगावर पडल्याने अमित जगताप या 45 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता. त्यांना न्याय...


Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधरमध्ये ठाकरेंचीच गर्जना! अनिल परब यांचा 26 हजार मतांनी विजय

Vidhan Parishad Nivadnuk Nikal : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे.मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाने आपले वर्चवस्व सिद्ध केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचेच ज. मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला आहे.


PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा

PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाPM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पावर्ल्ड कपच्या विजयानंतर अखेर टीम इंडिया भारतात पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी टीम इंडिया दिल्लीला पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती. त्याचे फोटो समोर आले आहेत. ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ आज (गुरुवारी) सकाळी नवी दिल्ली इथं पोहोचलं. बार्बाडोस इथं आलेल्या वादळामुळे भारतीय संघ तीन दिवसांपासून अडकलं होतं. अखेर बुधवारी ते विशेष विमानाच्या साहाय्याने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


Sanjay Raut| देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा

Preview for Sanjay Raut Target PM Modi As Buva


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.


Mumbai Crime: प्रियकराला मागेच्या दरवाज्याने बेडरुममध्ये घेऊन गेली तरुणी अन् घडलं भलतंच...

Mumbai Crime News: अत्यंत भयावह हत्याकांडाने देशाची आर्थिक राजधानी मुंबई हादरली आहे. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची तिच्याच घरात गळा घोटून निर्घृण हत्या केली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात ही धक्कादायक घटना घटली आहे. जाणून घ्या काय आहे नेमकं हे प्रकरण.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 02JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 02JULY 2024 बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण, मुंबई पदवीधर निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया, सेना भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष' कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी.. नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रं जमा करण्यासाठी महिलांच्या रांगा संभाजी भिडेंनी महिलांबद्दल बोलू नये, अन्यथा त्यांच्या मिशा कापू, वर्ल्ड ऑफ वूमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांचा इशारा


लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट, “शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकिट फायनल केलं होतं, पण…”

लक्ष्मण हाकेंनी एक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं त्याचाच संदर्भ घेऊन त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.


Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंजी पर्यटकांनी बहरली, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

Amboli Ghat Tourist : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी केली आहे.