RPF RECRUITMENT 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स

RPF Recruitment 2024: रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. भारतीय रेल्वेने आरपीएफ अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना अडचणी येतात; तर रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या भरतीसाठी उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ) एक यादी जारी केली आहे, ज्यामध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात का? त्यांच्यासाठी पात्रता, निकष, फॉर्म कसा भरायचा, ऑफलाइन किंवा ऑनलाइन फॉर्म भरताना कोणत्या कागदपत्रांची गरज असते आदी अनेक प्रश्नांची उत्तरे रेल्वे मंत्रालयाने दिली आहेत.

कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्याची तारीख?

उत्तर – रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पदासाठी अर्ज प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ मे असणार आहे.

ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवार माहितीमध्ये बदल करू शकतात का?

उत्तर – जर उमेदवारांना ‘अकाउंट’ तयार करताना ऑनलाइन भरलेल्या फॉर्ममध्ये ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि आरआरबी व्यतिरिक्त इतर माहिती बदलायची असल्यास किंवा एडिट करायची असल्यास उमेदवार २५० रुपयांचे शुल्क भरून फॉर्ममध्ये बदल करू शकतात.

ज्या उमेदवारांनी आधीच्या भरतीसाठी खाते तयार केले आहे, त्यांनी नवीन खाते तयार करावे का?

उत्तर – नाही. ज्या उमेदवारांनी आधीच CEN No.01/2024 (ALP) किंवा 02/2024 (तंत्रज्ञ) किंवा RPF 01/2024 उपनिरीक्षक (कार्यकारी) पदासाठी अर्ज करताना खाते तयार केले असेल तर त्यांना पुन्हा खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी CEN No.RPF 02/2024 कॉन्स्टेबल (कार्यकारी) साठी अर्ज करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन केले पाहिजे.

हेही वाचा…WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज

अकाउंट कसे उघडावे ?

जर उमेदवारांनी वर नमूद केलेल्या CEN साठी खाते तयार केले नसेल तर त्यांनी अर्ज लिंक होम पेजवर “क्रिएट ॲन अकाउंट” टॅबवर क्लिक करा. ऑनलाइन ‘क्रिएट ॲन अकाउंट’ फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. पासवर्ड हे कॅपिटल अक्षरे, लहान अक्षरे, स्पेशल कॅरेक्टर्स आणि संख्या यांचे एकत्रीकरण असावे. अकाउंट तयार झाल्यानंतर उमेदवारांना एसएमएस आणि ईमेल प्राप्त होईल.

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आधार कार्ड नसेल तर कोणती कागदपत्रे बरोबर घेऊन जावीत?

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आधार कार्ड असणे महत्त्वाचे आहे. जर उमेदवारांकडे आधार नसल्यास तुम्ही खालीलपैकी कोणत्याही कागदपत्रांचा तपशील देऊ शकता.

१. वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) , पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र

२. कर्मचारी आयडी (सरकारी नोकरी)

३. शाळा/कॉलेज/विद्यापीठाचा आयडी (अजून शिकत असल्यास)

पासवर्ड विसरल्यास उमेदवारांनी काय करावे?

उमेदवार लॉगिन पेजवरील ‘फॉरगेट पासवर्ड’ पर्यायावर क्लिक करू शकतात. तुमची जन्मतारीख, तुमचा ईमेल किंवा मोबाइल नंबर एंटर करा. सुधारित पासवर्ड उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल. त्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवलेला सुधारित पासवर्ड वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. लॉग इन केल्यानंतर, उमेदवार ऑनलाइन अर्ज पेजच्या वरच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘पासवर्ड बदला’ पर्यायावर प्रवेश करून नवीन पासवर्ड तयार करू शकतात.

2024-04-19T15:48:15Z dg43tfdfdgfd