ARSONISTS ATTACK FRENCH RAILWAYS : ऑलिम्पिकच्या उद्घाटनाआधीच फ्रान्सच्या रेल्वे स्थानकांवर जाळपोळ; हाय स्पीड ट्रेन लक्ष्य!

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रम अगदी काहीच वेळात सुरू होणार आहे. त्याआधीच फ्रान्समधील अत्यंत व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनच्या नेटवर्कला लक्ष्य करण्यात आलं.

सरकारी मालकीच्या रेल्वे ऑपरेटरने सांगितले की, जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते. त्यांनी सर्व प्रवाशांना त्यांचा प्रवास तात्पुरता रद्द करून पुढे ढकलण्याचं आवाहन केलं आहे. दुरुस्तीचे काम चालू होते, परंतु आता किमान शनिवार व रविवारही वाहतूक विस्कळीत असेल.

सविस्तर बातमी अपडेट होत आहे

2024-07-26T09:40:36Z dg43tfdfdgfd