SUDHA MURTHY RAJYA SABHA SPEECH: ‘सर, कसं बोलायचं कळत नाही...’ राज्यसभेत पहिलंच भाषण, सुधा मूर्तींनी जीवाभावाचे विषय मांडत जिंकलं मन

नवी दिल्ली : इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी खासदार म्हणून राज्य सभेतील आपल्या पहिल्याच भाषणात दोन मुद्दे उपस्थित करून सर्वांची मने जिंकली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर सभागृहातील चर्चेत भाग घेत नामनिर्देशित सदस्य सुधा मूर्ती यांनी महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम कोविडच्या काळात आयोजित केली होती तशीच मोहीम राबवण्याची मागणी केली. सुधा मूर्ती म्हणाल्या की महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ते रोखण्यासाठी पौगंडावस्थेतील लसीकरणाची व्यवस्था केली जावी.

सुधा मूर्तींचे राज्यसभेतील विधान

‘सर, कसं, कुठून सुरू कर? मला माहीत नाही. आदरणीय उपाध्यक्ष महोदय, हे माझे पहिले भाषण आहे. सर, माझ्याकडे किती वेळ आहे? पाच मिनिटे, ओके सर. सर, राष्ट्रपतींनी माझे नाव राज्यसभेसाठी सुचवले, त्यासाठी मी आभारी आहे. देशाच्या पंतप्रधानांनी महिला दिनी माझ्या नावाची घोषणा केली. मी नेमीचं तळागाळातील गरिबांसाठी काम केले आहे, त्यामुळे मला दोन्ही सभागृहांचा अनुभव नाही.’

Sudha Murthy Ji's first speech in the Rajya Sabha House. Such Humility, Clarity & Track Record.

We need more representations like her in Bharat 🔥🔥

Watch & Share Widely. She is an Inspiration for all of us.#FI pic.twitter.com/d4oAYptjEx

— Fundamental Investor ™ 🇮🇳 (@FI_InvestIndia) July 3, 2024 ]]>

नामवंत समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी या ओळींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. १४ मार्च रोजी सुधा यांनी पती नारायण मूर्ती यांच्या उपस्थितीत खासदार म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान त्यांनी महिलांशी संबंधित दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

सुधा मूर्तींचे राज्यसभेतील भाषणातील मुद्दे

इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा म्हणाल्या की, आपली समाज व्यवस्था अशी आहे की महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. जेव्हा तो रुग्णालयात पोहोचते तेव्हा तिच्या गर्भाशयाचा (सर्व्हायकल कॅन्सर) कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असतो, त्यांना वाचवणे कठीण होऊन बसते. तसेच त्यांनी पुढे म्हटले की माझे वडील म्हणायचे की महिला कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे आणि महिलेच्या मृत्यूनंतर पतीला दुसरी पत्नी मिळते, परंतु मुलांना दुसरी आई मिळत नाही.

कोविड काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती, मग मग महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी मोहीम का सुरू केली जाऊ शकत नाही? सरकारने हस्तक्षेप केला तर लस महागात पडणार नाही आणि याचा फायदा मोठ्या लोकसंख्येला होणार आहे, असे सुधा मूर्ती यांनी म्हटले.

पर्यटन क्षेत्राकडेही लक्ष द्या...

पर्यटनाचा संदर्भ देत सुधा मूर्तीनी म्हटले की लोक अजिंठा, एलोरा आणि ताजमहालला भेट देतात पण भारतातील ४२ वारसा स्थळे आहेत ज्यांची ना फारशी प्रसिद्धी झाली ना लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जागरूक आहेत. हा आपला देश आहे आणि आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास गौरवशाली आहे. त्रिपुरातील उनाकोटी १२,५०० वर्षांहून अधिक जुने असूनही त्याबद्दल कोणालाही माहिती नाही. काश्मीरच्या मुघल गार्डन्सचा वारसा स्थळात समावेश नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी पुढे म्हटले की, गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, वाराणसीजवळील सारनाथ, मध्य प्रदेशातील मांडू किल्ला, कर्नाटकातील श्रवणबेळगोला मंदिर... आपल्या सुंदर देशात काय नाही. त्याची योग्य प्रसिद्धी करून सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जनजागृती करावी.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T06:05:07Z dg43tfdfdgfd