INHERITANCE TAX: ‘थेट मध्यमवर्गाला फटका...’ वारसा करावर अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला आरसाच दाखवला, म्हणाल्या...

नवी दिल्ली : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा कराची (इन्हेरीटन्स टॅक्स) वकिली करून चर्चेचा नवीन मुद्दा सुरू केला आहे मात्र, सॅम यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने आपले मत स्पष्ट केले आहे. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वारसा करावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान प्रथमच विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बेंगळुरूच्या जयनगर येथे मतदान केल्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी वारसा करावर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वारसा कराच्या वादावर काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि शुक्रवारी बेंगळुरूमध्ये मतदान केल्यानंतर पाहते की, वारसा कराचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसणार आहे.

वारसा करावर अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचा दाखवला आरसा

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात मतदान होत असताना मतदान केंद्रावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गर्मीला मागे टाकून मोठ्या उत्साहाने लोक मतदानाचा हक्क बजावत आहे. निवडणुकीच्या या वातावरणात इंडिया ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कराचा मुद्दा उपस्थित करून निवडणुकीचं वातावरण आणखी तापवलं आहे.

पित्रोदा यांच्या वैयक्तिक वक्तव्यावर पाणी ओतून काँग्रेस गोंधळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असली तरी भाजप मात्र बाहेर पडू देत नाहीये. सध्या सुरू असलेल्या मतदानादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसला भूतकाळाचा आरसा दाखवला.

वारसा टॅक्सवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विधान

शुक्रवारी बेंगळुरूमध्ये मतदान केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी वारसा करावर आपले मत स्पष्ट करत यावेळी त्यांनी कष्टकरी मध्यमवर्गीय कुटुंबांवर वारसा कर लादल्याच्या परिणामांवर चिंता व्यक्त केली. अर्थमंत्र्यांनी म्हटले की वारसा कराचा कराचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांवर होईल आणि असे लोक जे मेहनतीने घर घेतात आणि काही पैसे वाचवतात. जर वारसा कर लागू झाला तर मध्यमवर्गीय त्यांची संपत्ती पूर्णपणे त्यांच्या मुलांना देऊ शकणार नाहीत.

#WATCH | Bengaluru: On Chairman of Indian Overseas Congress Sam Pitroda's remark, Union Minister Nirmala Sitharaman says, "It (Inheritance Tax) directly hits the middle class. It directly hits the aspirational class. They work hard, sweat and toil of theirs are saved in small… pic.twitter.com/dK55KTQmXZ

— ANI (@ANI) April 26, 2024 ]]>

सर्वकाही व्यर्थ ठरेल

वारसा कर लागू झाल्यास गेल्या दहा वर्षांत भारताने केलेली सर्व प्रगती व्यर्थ जाईल आणि देश पुन्हा त्या काळात जाईल जेव्हा काँग्रेस ९० टक्के कर वसूल करायची असे अर्थमंत्र्यांनी म्हटले.

‘मला १९६८ मधील तो दिवसही अजूनही आठवतो जेव्हा लोकांना त्यांच्या मालमत्ता किंवा उत्पन्नाच्या बदल्यात सक्तीच्या ठेव योजनेअंतर्गत ठराविक रक्कम बँकेत जमा करावी लागायची पण त्यासाठी कोणतेही कारण दिले जायचे नाही. अशा प्रकारे पैसे कमावणाऱ्यांना शिक्षा व्हायची तर गेल्या दहा वर्षांत भारताने केलेली प्रगती शून्य होईल. आत्ताच्या पिढीला काँग्रेसच्या त्या कालखंडाची माहिती नाही.’

सॅम पित्रोदा यांच्या विधानावर हल्ला करणाऱ्या भाजप नेत्यांच्या आरोपांवर, काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे की वारसा कर लावण्याचा आपला कोणताही हेतू नाही आणि तो आपल्या जाहीरनाम्यात देखील समाविष्ट नाही.

Read Latest Business News

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-27T03:55:42Z dg43tfdfdgfd