RRC Central Railway Bharti 2024: RRC म्हणजेच सेंट्रल रेल्वेच्या द रेल्वे रिक्रुटमेंट सेल यांच्यातर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून २ हजार ४२४ उमेदवारांना अप्रेंटिसशिप देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज सादर करण्यासाठी दिनांक १६ जुलै २०२४ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२४ इतका कालावधी नेमून देण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२४ नंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीमधून २ हजार ४२४ तरुणांना रेल्वेसोबत अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळेल. या कामाच्या अनुभवावरून या सर्व उमेदवारांना पुढे सेंट्रल रेल्वेसोबत काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही भरती खुली केली आहे.
RRC Vacancy Age Limit: वयोमर्यादा आणि शुल्क-
रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत असलेल्या या भरतीतून अप्रेंटिसशिप मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे वय वर्ष १५ ते २४ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. SC, ST वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेच्या अटीत ५ वर्षांची सूट दिली जाईल. तर OBC वर्गातील वयोमर्यादेत उमेदवारांना यात ३ वर्षांची सूट मिळेल. SC, ST या वर्गातील उमेदवारांना तसेच महिला उमेदवारांना हा अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. OBC आणि खुल्या वर्गातील अर्जदारांकडून हा अर्ज भरण्यासाठी १००/- अर्ज शुल्क आकारले जाईल.
RRC Bharti Educational Qualification: आवश्यक शैक्षणिक पात्रता-
RRC Vacancy How to Apply: अर्ज कसा भरावा?
अप्रेंटिसशिपच्या २ हजार ४२४ पदांसाठी सुरू असलेल्या या भरतीबद्दलचे नोटिफिकेशन तुम्हाला https://www.rrccr.com/rrwc/Files/be2a1bd2-2e6a-4ce1-ba0b-82dd736d7ae9.pdf या लिंक वर पाहता येईल. तसेच https://rrccr.com/TradeApp/Login या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार त्यांचा या अप्रेंटिसशिप साठी चा अर्ज सादर करू शकतात.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-07-27T10:34:04Z dg43tfdfdgfd