RAILWAY RECRUITMENT 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोकण रेल्वेत रिक्त पदांसाठी भरती, ३५ हजारांपर्यंत मिळणार पगार

Konkan Railway jobs 2024 : रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून नेमकी कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, अर्ज कुणी करावा, त्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या बातमीमध्ये मिळेल.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड १९० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवार यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत konkanrailway.com वर अर्ज करू शकतात.

कोणत्या विभागात किती जागा?

विद्युत विभाग :

  • वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer): ५ रिक्त जागा
  • तंत्रज्ञ (Technician-I II): १५ जागा
  • असिस्टंट लोको पायलट: १५ जागा
नागरी विभाग :

  • वरिष्ठ विभाग अभियंता: ५ रिक्त जागा
  • ट्रॅक मेंटेनर: ३५ रिक्त जागा
यांत्रिक विभाग :

  • तंत्रज्ञ (Technician-I II) २० रिक्त जागा
ऑपरेटिंग विभाग :

  • स्टेशन मास्टर: १० रिक्त जागा
  • गुड्स ट्रेन मॅनेजर: ५ जागा
  • पॉइंट्स मॅन: ६० रिक्त जागा
सिग्नल आणि दूरसंचार विभाग :

  • ईएसटीएम (ESTM-III) : १५ जागा
व्यावसायिक विभाग :

  • व्यावसायिक पर्यवेक्षक: ५ जागा
कोणाला करता येईल अर्ज?

  • एससी आणि एसटी उमेदवार - वय मर्यादा ४१ वर्षे
  • ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) उमेदवार - वयोमर्यादा ३९ वर्षे
  • माजी सैनिक - वयपमर्यादा ३९ वर्षे
  • माजी सैनिक (OBC-NCL) वयोमर्यादा ४२ वर्षे
  • माजी सैनिक : (SC आणि ST) वयोमर्यादा ४४ वर्षे
  • अपंग (PwBD) :४६ वर्षे
  • PwBD - OBC : ४९ वर्षे
  • PwBD - अनुसूचित जाती आणि ST - ५१ वर्षे
  • कोकण रेल्वेमध्ये ३ वर्षे सेवा दिलेले कर्मचारी - वयोमर्यादा ४० वर्षे
ज्या उमेदवारांची जमीन KRCL प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. जमीन गमावणाऱ्यांची जोडीदार (पत्नी/पती), मुलगा, मुलगी, नातू आणि नातवंडे देखील पात्र आहेत. या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्रथम प्राधान्य मिळेल.

कोकण रेल्वे मार्गावरील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत वैध एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड असलेल्या उमेदवारांना या भरती मोहिमेत दुसरे प्राधान्य मिळेल. महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकमध्ये राहणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी तिसरे प्राधान्य मिळेल.

पदांनुसार वेतन-१. सीनियर सेक्शन इंडजीनियर ४४,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 7)

२. स्टेशन मास्टर : ३५,४०० रुप्ये प्रति महिना (पे लेव्हल

३. व्यावसायिक पर्यवेक्षकासाठी: ३५,४०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 6)

४. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी: २९,२०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 5)

५. टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल): १९,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 2)

६. असिस्टंट लोको पायलटसाठी: ९,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 2)

७. पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनरसाठी: १८,००० रुपये प्रति महिना (पे लेव्हल (1)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-18T06:07:14Z dg43tfdfdgfd