NCERT BHARTI 2024 : एनसीईआरटीमध्ये ‘या’ पदांवर भरती; १० मे अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

NCERT Recruitment 2024 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, ज्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. उमेदवार NCERT च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, जर तुम्हाला या पदांवर नोकरी मिळवायची असेल तर १० मे पर्यंत अर्ज करा.

रिक्त जागांचा तपशील :

या भरती मोहिमेद्वारे NCERT द्वारे एकूण ३० रिक्त पदांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये शैक्षणिक सल्लागाराची ३ पदे, द्विभाषिक अनुवादकाची २३ पदे आणि कनिष्ठ प्रकल्प फेलोची ४ पदे भरायची आहेत.

अर्जासाठी आवश्यक पात्रता :

  • NCERT ने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी (CIET) अंतर्गत शैक्षणिक सल्लागार, द्विभाषिक अनुवादक आणि कनिष्ठ प्रकल्प फेलोसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक सल्लागार पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी पात्रता असणे आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवीधारक द्विभाषिक अनुवादक पदांसाठी अर्ज करू शकतात.
  • कनिष्ठ प्रकल्प फेलोसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणतीही पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेविषयी :

NCERT च्या या रिक्त पदांतर्गत, शैक्षणिक सल्लागार आणि द्विभाषिक अनुवादकाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्षे आणि कनिष्ठ प्रकल्प फेलोसाठी, कमाल वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अशी असणार निवड प्रक्रिया :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे अंतिम उमेदवारांची यादी तयार केली जाईल.

एवढा पगार तुम्हाला मिळेल :

  • शैक्षणिक सल्लागार पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा पगार म्हणून ६०,००० रुपये मिळतील.
  • द्विभाषिक अनुवादकासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये ३०,००० रुपये वेतन दिले जाईल.
  • ज्युनियर प्रोजेक्ट फेलोसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना वेतन म्हणून ३१ हजार रुपये दिले जातील.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-02T15:05:28Z dg43tfdfdgfd