MUMBAI PORT TRUST RECRUITMENT 2024: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, अर्जाची लिंक बातमीत

Mumbai port trust jobs: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. 'VTMS ऑपरेटर कम शिपिंग असिस्टंट' या पदांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

'VTMS ऑपरेटर कम शिपिंग असिस्टंट' या पदासाठी एकूण ७ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध पदांसाठी ही भरती होणार असून, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार अर्ज करायचे आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४ साठी अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही १८ ऑक्टोबर २०२४ आहे.

  • पदाचे नाव – VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा - २५- ४५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप कार्यालय संरक्षक/ हार्बर मास्टर.
  • अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता – [email protected] आणि [email protected]
  • अधिकृत वेबसाईट -https://mumbaiport.gov.in/

अर्ज कसा करावासदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करता येईल. अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

अधिक माहितीकरिता PDF-https://drive.google.com/file/d/1zbwB5cP1EGBujEuKp0XUxC_LVRFbhL6Q/view

शैक्षणिक पात्रता:प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांना अधिकृत जाहिरातीत दिलेली माहिती वाचूनच अर्ज करावा लागेल. किमान पदवीधर उमेदवारांसाठी अनेक पदांच्या संधी उपलब्ध आहेत, तर काही तांत्रिक पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि पात्रता आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया:उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे होईल. अर्ज केलेल्या पदानुसार परीक्षा आणि चाचण्यांचे स्वरूप वेगवेगळे असेल. मुंबई पोर्ट ट्रस्ट ही एक प्रतिष्ठित संस्था असून, या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-19T12:07:45Z dg43tfdfdgfd