IBDP PAPER LEAK : आयबीच्या विद्यार्थ्यांनी टाइम झोनचा फायदा घेत गणिताचा पेपर फोडला; परीक्षेपूर्वी सोशल मीडियावरून डाउनलोड केला पेपर

IBDP Paper Leak : मागील वर्षी म्हणजेच, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट 'फर्रे' पाहिला असेल, तर तुम्हाला 'टाइम झोन चीटिंग (Time Zone Cheating)' बद्दल देखील माहिती असेल. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. इयत्ता १२ वी समकक्ष इंटरनॅशनल बॅकलॅरिएट डिप्लोमा प्रोग्राम (IBDP) ने गेल्या आठवड्यात गणिताच्या चाचण्यांदरम्यान 'टाइम झोन टिचिंग' चे प्रकरण समोर आले आहे. एका टाइम झोनमधील विद्यार्थ्यांनी गणिताचे प्रश्न लक्षात ठेवले आणि नंतर स्वतःची परीक्षा झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर या परीक्षेतील प्रश प्रसिद्ध केले. अर्थात, इतर टाइम झोनमधील विद्यार्थ्यांना त्याने परीक्षेपूर्वी प्रश जाणून घेण्यास मदत केल्याची संभाव्यता नाकारता येत नाही.

पेपर लीक प्रकरण ३ मे रोजी उघडकीस :

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, IB परीक्षा २४ एप्रिलपासून सुरू झाल्या. १ आणि २ मे रोजी दोन तासांची गणिताची परीक्षा झाली. तर, ३ मे २०२४ रोजी पेपर लीक उघडकीस आल्याचे आयबी बोर्डाने मान्य केले. मात्र, हा पेपर कोणत्या देशातून फुटला याबाबत बोर्डाने कोणताही उल्लेख केलेला नाही. एसएमसीपीच्या अहवालानुसार, पेपरची सामग्री ४५ हजारांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केली गेली.

पेपरफुटीची ही पहिलीच घटना :

मुंबईतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरचा मजकूर तुर्कीमधून अपलोड करण्यात आला होता. त्यांच्यामते, वेळेतील फरक लक्षात घेता, भारतीय विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळण्याची शक्यता खूपच कमी होती, परंतु या सामग्रीचा हाँगकाँग, सिंगापूर, युरोप आणि अमेरिकेतील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. स्वित्झर्लंड-आधारित बोर्ड ५५ वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे. बोर्डाच्या इतिहासात पेपरफुटीची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यापूर्वी 'टाइम झोन चीटिंग'कडे लक्ष दिले जात नसल्याचेही बोलले जात आहे.

बोर्ड परीक्षा तीन टाइम झोनमध्ये :

आयबी बोर्ड तीन टाइम झोनमध्ये परीक्षांचे आयोजन करते, ज्यामध्ये झोन ए मध्ये आशिया आणि ऑस्ट्रेलिया, झोन बी मध्ये युरोप आणि अमेरिका आणि झोन सी मध्ये तीन वेळा झोनमध्ये परीक्षा आयोजित केली जाते. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, टाइम झोन फसवणूक करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यांची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास, विद्यार्थ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामध्ये संबंधित विषयांसाठी गुण न देणे, डिप्लोमा न देणे आणि पुढील परीक्षांवर बंदी घालणे यासह गंभीर परिणाम होऊ शकतात.

जाणून घ्या आयबी विषयी हि माहिती :

इंटरनॅशनल बॅकलॅरिएट ही एक प्रतिष्ठित शिक्षण प्रणाली आहे. IB चे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे आणि त्याची स्थापना १९६८ मध्ये झाली. माहितीनुसार, १६० देशांतील ५ हजार ७०० शाळांमध्ये ८००० हून अधिक अभ्यासक्रम चालवले जातात. ही एक ना-नफा संस्था आहे जी सांस्कृतिक हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गव्हर्नर मंडळाद्वारे शासित आहे. भारतात २१० IB वर्ल्ड स्कूल आहेत. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलोर आणि चेन्नई येथे मोठ्या संख्येने या शाळा आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-08T13:27:36Z dg43tfdfdgfd