CBSE RESULT 2024 : सीबीएसई १० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १२ मे पर्यंत लागणार? मागील वर्षांचे ट्रेंड तपासा

CBSE 10th Result 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच सीबीएसई २०२४ च्या १० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर असे अपेक्षित आहे. CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांच्या परीक्षेचा निकाल cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत. यंदा, CBSE बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती, तर इयत्ता बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती. दोन्ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये म्हणजेच सकाळी १०.३० ते दुपारी ०१.३० या कालावधीत झाल्या.

यावर्षी २६ वेगवेगळ्या देशांतील एकूण ३९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एकट्या राष्ट्रीय राजधानीत, ५.८० लाख विद्यार्थ्यांनी CBSE बोर्ड परीक्षा २०२४ परीक्षेला बसले होते, ज्या ८७७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या.

CBSE ने १० वी आणि १२ वी या दोन्ही परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्याची परंपरा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमधील "अस्वस्थ स्पर्धा (unhealthy competition" चे प्रमाण कमी करणे आहे.

गेल्या वर्षी, CBSE इयत्ता १०, १२ चा निकाल १२ मे २०२३ रोजी घोषित करण्यात आला. इयत्ता १० वीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९३.१२ टक्के इतकी नोंदवली गेली, तर CBSE १२ वी उत्तीर्ण टक्केवारी ८७.३३ % होती.

CBSE बोर्ड १० वी, १२ वीच्या निकालाचे अधिकृत अपडेट्स कुठे जाणून घ्यायचे?

CBSE वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या तारखेची माहिती तपासू शकतात. इयत्ता १० वीच्या निकालासंबंधीचे अपडेट बोर्डाकडून या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T06:22:44Z dg43tfdfdgfd