लग्नाचे अर्धे विधी पार पडले अन् मध्येच घडलं भयानक कांड, वरानं मंडपंच सोडला...

गौरव सिंह, प्रतिनिधी

भोजपुर : सध्या लग्नसराई सुरू आहे. विविध ठिकाणी लग्नसोहळे मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहेत. मात्र, यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वधू आणि वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतरही लग्न होऊ शकले नाही. या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे.

ही घटना बिहार राज्यातील आरा येथील रामपूर गावातील आहे. चातर गावातील रहिवासी असलेले पक्षी पासवान यांचा मुलगा सूरज पासवान याचे लग्न रामपूर गावातील रहिवासी शंकर पासवान यांची मुलगी बेबी कुमारी हिच्यासोबत जुळले होते. लग्नाची तारीख ठरल्यानुसार, 28 एप्रिल रोजी सूरज पासवान वरात घेऊन रामपूर येथे आला होता. यानंतर अत्यंत उत्साहात वधू वरांनी एकमेकांना वरमालाही घातली.

मात्र, याच दरम्यान, वधूच्या काकाचा मुलाच्या भावासोबत वाद झाला. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मारहाणही झाली. यानंतर वराने लग्न न करता लग्नमंडप सोडत तिथून फरार झाला. यामुळे याठिकाणी अत्यंत गोंधळाचे वातावरण तयार झाले आणि लग्न जुळवणारे मध्यस्थ आणि मुलीच्या बाजूने सतत वरपक्षाला लग्न जुळवण्याबाबत मदत मागण्यात आली.

#किस्से निवडणुकीचे : इंदिरा गांधींसाठी केलं विमान हायजॅक, काँग्रेसने दिलं 7 वेळा तिकिट, तरीसुद्धा..

वधूपक्षाच्या अनेक प्रयत्नानंतर वरपक्षाचे लोक लग्नासाठी तयार झाले. तसेच आमच्या गावाजवळ लाहौंग बाबा मठिया येथील मंदिरात यावे, याठिकाणी लग्न होईल, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार, वधूपक्षाची मंडळी संबंधित मंदिरात पोहोचले. मात्र, वरपक्षाची मंडळी लग्नासाठी आली नाही. यानंतर मध्यस्थांनी आणि नातेवाईकांनी पुन्हा हस्तक्षेप करुन वर आणि वर आणि त्यांच्या नातेवाईकांना विनंती केली.

यानंतर पुन्हा वधू पक्षाच्या लोकांना 5 मे रोजी वरमुलाच्या गावातील मंदिरात लग्नासाठी बोलावण्यात आले. मात्र, जेव्हा यावेळीही मुलगा लग्नासाठी नाही आला, तेव्हा वधूकडच्या लोकांनी बडहरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मदतीची मागणी केली.

याबाबत वधू बेबी कुमारी या तरुणीने लोकल18 शी बोलताना सांगितले की, लग्नाची अर्धे विधी झाल्यावर माझे काका आणि वराचा भाऊ यांच्यामध्ये एका विषयावरुन वाद झाला. यानंतर मारहाणही झाली. यानंतर वर लग्न सोडून रागाच्या भरात निघून गेला.

heatstroke : उन्हाळ्यात वाढला आजारांचा धोका, या गोष्टी ठरतील शरीराला खूपच फायदेशीर

यानंतर वरपक्षाच्या वतीने दोन वेळा मंदिरात बोलावण्यात आले. मात्र, वरपक्षाच्या वतीने याठिकाणी कुणीच आले नाही. यानंतर आम्ही पोलिसात धाव घेतली. तसेच आता वरपक्षाला बोलावण्यात आले आहे. जर त्यांनी लग्न केले नाही तर आम्ही वराच्या विरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल करू, असेही तिने सांगितले. तर याप्रकरणी बडहरा पोलीस ठाण्याचे प्रमुख संजय कुमार यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, याप्रकरणी अद्याप  कोणत्याही बाजूच्या वतीने लेखी तक्रार आलेली नाही. याप्रकरणी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

2024-05-06T02:27:23Z dg43tfdfdgfd