मनोज जरांगेंचे आज मध्यरात्रीपासून पुन्हा आमरण उपोषण

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी आमच्या व्याख्यानुसार करा, राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र द्या, शिंदे समितीच्या नोंदी शोधायचे काम पुन्हा सुरु करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, आदी मागण्यांबाबत सरकारने तातडीने कार्यवाही सुरू करावी, यासाठी आज (दि.१६) मध्यरात्रीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु करत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange) यांनी सांगितले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते (Manoj Jarange) पुढे म्हणाले की, हैदराबादचे गॅझेट लागू करायच्या हालचाली तीन महिन्यांपासून सुरु आहेत. कोणी  यावे म्हणून आंदोलनाचा उद्देश नाही. आंदोलन करताना, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला निवडणुकीशी काहीही देणं घेणं नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचे नाही, पण आमच्या मागण्या मान्य करा.

आमचा सगळा समाज हा मराठा आणि कुणबी एकच असून आम्हाला बाकीच्या विषयावर बोलायचे नाही. मी काय छगन भुजबळसारखे आंदोलन चालवत नाहीत त्याच्या सारखे आम्ही रडत नाही. जर  मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. राजकारणात यायचे नाही म्हणून पुन्हा उपोषण करत आहे.

धनगर समाजाची आरक्षणाची मागणी खूप वर्षांपासून आहे. गोरगरिब धनगरांच्या लेकरांचे कल्याण झाले पाहिजे. छगन भुजबळांचे एकूण भांडण करू नका. ते बुद्धीभेद करून दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मी धनगर बांधवांना सांगतो, फुकट भांडण अंगावर घेवू नका. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही तुमच्या एसटीतून आरक्षणाला विरोध केला नाही. विरोध केल्यानंतर बोला, असे जरांगे म्हणाले.

समाजासाठी लढायला मी पुन्हा तयार : मनोज जरांगे-पाटील

2024-09-16T14:29:46Z dg43tfdfdgfd