पूजा मॅडम नंतर आता आणखी 30 अधिकारी अडचणीत, UPSC कडून कारवाई होणार?

दिल्ली, प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी : दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देऊन आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरची केंद्र सरकारकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. 6 सप्टेंबर 2024 च्या आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केलं आहे. त्यामुळे अखेरीस पूजा खेडकर बनावटगिरी प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अखेरीस केंद्र सरकारने कारवाई केली आहे. तीन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणखी एक रिपोर्ट दाखल केला होता. यात पूजा खेडकरच्या दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. पूजा खेडकरने सिव्हिल सेवा परीक्षा २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेत दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती.

दरम्यान पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यूपीएससीला आणखी तीस अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 30 वेगवेगळया अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास 30 तक्रारी यूपीएससीकडे दाखल करण्यात आल्या आहेत. यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. या तक्रारी देशातील विविध भागातून युपीएससीला प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीने पाठवल्या आहेत. आता या प्रकरणा काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2024-09-08T02:44:39Z dg43tfdfdgfd