नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सलग दुसऱ्या दिवशी आज देशाचे हृदयस्थल असलेल्या नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दुपारी 2.24 मिनिट 17 सेकंदांनी सौम्य भूकंपाचे हादरे बसले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 2.4 मॅग्नेट्यूड अशी असून नागपूर जिल्ह्यातील कुही हे केंद्रस्थान असल्याची नोंद भूकंप मापन कार्यालयात झालेली आहे.

शुक्रवारी 2.5 मॅग्नेट्यूड तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाबतीत अतिशय सुरक्षित मानल्या जात असलेल्या नागपूरला एकाच महिन्यात भूकंपाचे हे तिसऱ्यांदा धक्के बसले आहेत हे विशेष. शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची मॅग्नेट्यूड खोली 2.4 क्षेत्रफळ पाच किलोमीटर तर लॅटिट्युड लोंगेस्ट 21.2 आणि 79.32 अशी नोंद झाली आहे. मात्र काल प्रमाणेच आजही नागरिकांना हे धक्के जाणवले नाहीत.कुही परिसर हा खनिज उतखनन सातत्याने होत असलेला परिसर असल्यानेही त्याची तीव्रता जाणवली नसल्याचे बोलले जाते

2024-05-04T18:08:16Z dg43tfdfdgfd