तिरुपती देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत

तिरुमला; वृत्तसंस्था : जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार 161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. गेल्या 12 वर्षांतील हा उच्चांक असून, गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एफडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे. बँकांमधील ट्रस्टची एकूण एफडी 13,287 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विविध बँकांतील मुदत ठेवी आणि ट्रस्टमधील रोकड मिळून मंदिराचा बॅलन्स 18 हजार 817 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

वाढता वाढता वाढे…

2012 मध्ये ट्रस्टची एफडी

4,820 कोटी रु.

2013 मध्ये 608 कोटी

2014 मध्ये 970 कोटी

2015 मध्ये 961 कोटी

2016 मध्ये 1,153 कोटी

2017 मध्ये 774 कोटी

2018 मध्ये 501 कोटी

2019 मध्ये 285 कोटी

2020 मध्ये 753 कोटी

2021 मध्ये 270 कोटी े

2022 मध्ये 274 कोटी

2023 मध्ये 757 कोटी

2013 ते 2024 ट्रस्टमध्ये

8,467 कोटी रुपये जमा झाले.

2024-04-23T01:57:42Z dg43tfdfdgfd