गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डुप्लीकेट चर्चेत!

आनंद-गुजरात : हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भासणारा गुजरातमधील आनंद येथील एक पाणीपुरी विक्रेता सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. अनिलभाई ठक्कर असे या पाणीपुरी विक्रेत्यांचे नाव असून मोदींसारखे दिसत असल्याने व पेहरावही मोदींप्रमाणेच करत असल्याने येथील स्थानिक नागरिक त्यांना पीएम मोदी याच नावाने ओळखत आले आहेत.

ठक्कर मूळचे जुनागढ येथील असून वयाच्या 18 व्या वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. हा गाडा त्यांच्या आजोबांनी सुरू केला होता. हुबेहूब मोदींसारखी दिसणारे ठक्कर हे काही पहिले नाहीत. यापूर्वी मुंबईतील विकास महंत हे देखील मोदींप्रमाणे दिसत असल्याने चर्चेत आले होते. विकास महंत त्यावेळी गरबा खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि यामुळे डीपफेकचे वावटळ उठले होते.

2024-04-29T08:11:31Z dg43tfdfdgfd