आता केवळ SMS करून मतदार यादीतील नाव तपासा, घरी बसून मिळवा ओळखपत्र; जाणून घ्या हा सोपा मार्ग

देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. आज येथे काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता आणि मतदार यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता. तुम्ही फक्त मेसेज करून मतदार यादीत तुमचे नाव तपासू शकता.

मतदार यादीतील नाव कसे तपासायचे

मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी इंटरनेटचीही गरज नाही. ही पद्धत तुमच्यासाठी खूप सोपी असू शकते. कारण हे करण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेबसाईट उघडावी लागणार नाही. युजर्स मेसेज पाठवून मतदार यादीची माहिती मिळवू शकतात, असे निवडणूक आयोगाने स्वतः आपल्या वेबसाइटवर सांगितले आहे. ही माहिती तुम्ही ऑनलाइन पोर्टल्स आणि ॲप्सवरही मिळवू शकता.

1950 वर पाठवा एसएमएस

एसएमएसच्या मदतीनेही याबाबत माहिती मिळू शकते. तुम्हालाही याबाबत माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला 1950 वर एसएमएस पाठवावा लागेल. येथे तुम्हाला EPIC क्रमांक लिहून पाठवावा लागेल. उदाहरणार्थ, तुमचा EPIC क्रमांक '87654321' असल्यास तुम्हाला मेसेज करावा लागेल - ECI 87654321.

ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड

तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, तुम्ही ते क्षणार्धात डाउनलोड करू शकता. ई-व्होटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला मतदार सेवा पोर्टलवर जावे लागेल. अधिकृत साइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला EPIC डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला जाईल. EPIC क्रमांक भरल्यानंतर तुम्ही तो डाउनलोड करू शकाल. जेव्हा तुम्ही मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी जाल, तेव्हा OTP चा ऑप्शन देखील मिळेल. तुम्ही त्यांचा मतदानासाठी देखील वापर करू शकता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-25T15:40:48Z dg43tfdfdgfd