मुंबई : राज्यात आतापर्यंत १३० रुग्णांसह हातपाय पसरणाऱ्या झिका (Zika Virus) या संसर्गजन्य आजाराने दादरमधून मुंबईत एन्ट्री केली. दादरसारख्या मध्य वस्तीत एक रूग्ण आढळल्याने मुंबई महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
दादरमध्ये ८६ वर्षीय पुरूषाला गेल्या आठवडय़ात झिकाची लागण झाली. त्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. वयोवृध्द रूग्णाला इतरही आजार असल्याचे सांगण्यात आले. दादरमध्ये ५,४०,७१२ लोकांची तपासणी करण्यात आली त्यातील २८९४ लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या परिसरातील ९४,८४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये २७४६ घरांमध्ये डासांची उत्पत्तीस्थळे सापडली आहेत. राज्यात झिकाचे सर्वाधिक १०० रुग्ण पुणे मनपा विभागात आहेत. पिंपरी चिंचवड ०६, अहमदनगर (संगमनेर) ११, पुणे ग्रामीण ९, कोल्हापूर १, सांगली (मिरज) १, सोलापूर १ अशी एकूण १३० रुग्णांची नोंद झाली आहे. झिकाचा धोका गर्भवती महिलांना अधिक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
2024-10-01T04:21:26Z dg43tfdfdgfd