UDDHAV THACKERAY: आमचे सरकार आल्यानंतर...; ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, जनतेला काय काय आश्वासन दिली?

Uddhav Thackeray Press Conference: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UTB) प्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी नुकताच आपल्या पक्षाचा जाहीरनामा (Shiv Sena UTB Manifesto) प्रसिद्ध केला आहे. देशात आणि राज्यात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही दुजाभाव न करता सर्व राज्यांना समान विकासाची संधी देऊ, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर लूट थांबवू, तरुणांना रोजगार देऊ, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, जिल्हा रुग्णालये अद्ययावत करणार, अशी आश्वासने उद्धव ठाकरेंनी जनतेला दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण राज्यावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असे होऊ नये. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणाले, "मी गुजरातच्या विरोधात नाही, महाराष्ट्राला लुटून गुजरातला पाठवले जात आहे. हे थांबले पाहिजे. सर्व राज्यांना त्यांचे स्वतःचे अधिकार आहेत, पण महाराष्ट्रातून जे हिसकावून गुजरातला पाठवले जात आहे ते आम्ही थांबवू. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाच्या प्रतिष्ठेनुसार बोलत नाहीत. त्यांनी आमच्या पक्षाला बनावट शिवसेना म्हटले, हे त्यांना शोभत नाही."

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपला पराभव दिसू लागला. यामुळे ते आता राम राम म्हणू लागले आहेत. हा त्यांचा नेहमीचा उद्याग आहे. आम्ही भाजपसोबत होतो. परंतु, त्यांच्या मनातील पाशवी इच्छा लोकांसमोर आली आहे. त्यांना देशाची घटना बदलायची आहे. पण जनता हुशार आहे. त्यांना सगळे समजले आहे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

- महाराष्ट्रात रोजगार

- ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या

- सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्णालये

- औषधाअभावी रुग्णांच्या मृत्यूवर नियंत्रण

- कंपन्यांनी विहित केलेले पीक विम्यामध्ये बदल

- उद्योगासाठी चांगली व्यवस्था

- इको-फ्रेंडली प्रकल्प

- टॅक्स टेरेरिज्म संपवणार

- जीएसटीमधील त्रासदायक अटी दूर करणार

- जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेव

2024-04-25T13:57:57Z dg43tfdfdgfd