बातम्या

Trending:


Weather update : महाराष्ट्राला हवामान विभागाकडून हायअलर्ट; पावसाबाबत मोठी बातमी

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी इतका असून शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास दिवसभर शहरात उष्णतेची लाट राहिल मात्र त्यानंतर सध्यांकीळ मघेगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईतील तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आज आणि उद्या पुणे शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. पुढील दोन तीन दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार आहे.


ABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासूनआयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरण-तरुणीचा जागीच मृत्यू मुंबईत आज आणि उद्या उकाडा कायम राहणार, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं मुंबईकर घामाघूम((मुंबईत गरमी, दमटपणा कायम राहणार)) मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज((मान्सून आज अंदमानात धडकणार)) वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार. सिंगापूर एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांची मे महिन्यातच दिवाळी, बोनस म्हणून आठ महिन्यांचा पगार मिळणार ((बोनस म्हणून आठ महिन्यांचा पगार!))


Hemadpanti Temple Pandharpur : उजनीच्या उदरात दडलेला हेमाडपंती मंदिराचा ठेवा Exclusive

Hemadpanti Temple Pandharpur : उजनीच्या उदरात दडलेला हेमाडपंती मंदिराचा ठेवा Exclusive सध्या दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली असून उजनी धरणाची पाणीपातळी वजा पन्नास टक्के एवढी खालावल्याने उजनीच्या उदरात जलसमाधी मिळालेल्या अनेक पुरातन वास्तू आणि पुरातन मंदिरे उघडी होऊ लागली आहेत . या जुन्या पुरातन वास्तू पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले उजनी धरणाकडे वाळू लागली आहेत . उजनी धरणाचे बांधकाम झाल्यावर १९७५ साली परिसरातील अनेक पुटं मंदिरे आणि वास्तू उजनीच्या उदरात गडप झाल्या होत्या . यंदा झपाट्याने उजनीचे पाणी पातळी खालावू लागल्याने या पुरातन वास्तू आणि मंदिरे पूर्णपणे बाहेर आली आहेत .


उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या …


ही ‘जादू’ करणार कोण?

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनी अंगावर काटा आणला. अंधश्रद्धेतून कुणाला जिवंत जाळण्याची लोकांची हिंमत होतेच कशी? कुठे वृद्धाच्या अंगावर चटके दिले जातात, तर कुणी स्वत:ची जिभ कापून घेतो. देशविकासात चकचकीत रस्त्यांचा वाटा नाकारण्यात अर्थ नाही; मात्र विज्ञानवादी समाजाची निकडही तेवढीच आहे. निवडणुकांच्या धावपळीत आशा सेविकांचे साडेचारशे कोटींचे पारिश्रमिक रेंगाळणार असेल तर मागास भागातील आरोग्याचे दुखणे दूर करण्याची ‘जादू’ कशी साधली जाणार?


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


Uddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जेपी नड्डांसह भाजपवर टीका केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. Uddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP Majha पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केलेल्या नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS) संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल. पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100 =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील . संघाला तुम्ही नष्ट करायला निघालेत : उद्धव ठाकरे जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत . नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


मुंबईत उष्मा कायम

मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते.


Maratha Reservation : सॉरी मम्मी-पप्पा...! 25 वर्षीय मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल; भावाला व्हॉट्सअ‍ॅप करत संपवली जीवनयात्रा

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही. तर दुसरीकडे दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवलीय. हे कृत्य करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता...


Ahmednagar Water Shortage : अहमदनगरमध्ये पिण्याचं पाणीही विकत घेण्याची वेळ, नागरिकांचं आंदोलन

Ahmednagar Water Shortage : अहमदनगरमध्ये पिण्याचं पाणीही विकत घेण्याची वेळ, नागरिकांचं आंदोलन अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांवर सध्या पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आलीय. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ३१२ टँकर सुरु करण्यात आले आहेत. सर्वाधिक ९९ पिण्याच्या पाण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत, मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील ५ ते ५ दिवस येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथल्या नागरिकांनी पाण्यासाठी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केलं. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं.


BCAS Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी; BCAS अंतर्गत १०८ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

BCAS Recruitment 2024: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) अंतर्गत १०८ पदांच्या विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे...


दोन वेळच्या जेवणासाठी खाल्ला मार; आज आहे 120 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक

मुंबई : आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची संघर्षगाथा सांगणार आहोत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे झाला. नवाजुद्दीनचा जन्म एका सामान्य मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी त्याने स्वत:च्या टॅलेंटच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवलं आहे. नवाजुद्दीनने बालपणी अत्यंत हलाखीचे दिवस पाहिले आहेत. नवाज त्याच्या आई-वडील आणि 8 भावंडांसोबत एका घरात राहत होता.नवाजने...


Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारवर हल्ला, आधी हार घातला आणि माग कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

Kanhaiya Kumar Video: कन्हैया कुमार हे काँग्रेसच्या तिकीटावर ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. यासाठी ते प्रचार करत आहेत. याच प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर सात ते आठ जणांनी हल्ला करत त्यांच्या कानशिलात लगावली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. कन्हैया कुमार यांनी भारतीय सैन्याविरोधात भाष्य केले होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे.


Loksabha Election : संजय राऊत यांची Uncut मुलाखत

Loksabha Election : Uncut


Manoj Jarange : Pankaja Munde जातीयवादी वक्तव्य करतात, मनोज जरांगेंचां घणाघात ABP Majha

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झाला, तो करण्याचे आदेश कुणी दिले होते, हे सरकारनं सांगावं, मग मी नावं घेणं बंद करेन असं जरांगे म्हणाले. पंकजा मुंडे यांचा पराभव करा असं मी कुठेही बोललो नाही, उलट त्या जातीयवादी राजकारण करतायेत असा आरोप त्यांनी केला आहे.


Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?

Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय? Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटील Kalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने? Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ Uddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ


PM Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील किती सदस्यांना घेता येतो

PM Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) 1 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेंतर्गत, सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹ 2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी ₹ 6000 ची रक्कम दिली जाते. जी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. सुरुवातीला केवळ 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट...


Pune PMPML : लोकसभा निवडणुकीत पीएमपीएमएल मालामाल, मतदान प्रक्रियेमध्ये दिलेल्या ९३१ गाड्या

Pune News : पुण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पीएमपीएमएलने मोठं उत्पन्न कमावलं आहे. मतदान प्रक्रियेत मतपेट्या नेण्यासाठी ९३१ गाड्या पीएमपीएमएलकडून देण्यात आल्या होत्या. यात PMPML ला मोठा फायदा झाला आहे.


Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या नातेवाईकाचे निधन

Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding Accident) 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावावे लागले. या घटनेने बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात कार्तिकच्या नातेवाईकांना प्राण गमवावे लागले. मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले....


Neral-Matheran Mini Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! माथेरानच्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनाचा साज

Mumbai News : मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे. वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग एकत्र करून त्याची जोडणी नेरळमध्ये करण्यात येणार आहे.


Maharashtra loksabha elections 2024: उध्दव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Maharashtra Loksabha Elections 2024: देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात कोणीत मागे नाही. कधी आरोपांच्या या फैरी टोकाच्या भूमीकेपर्यंत पोहचतात तर कधी मोठे गौप्यस्फोट आणि दावे प्रतिदावे होत आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


CBSE 11th Admission 2024 : सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश

CBSE 10th Result 2024 : दीर्घ प्रतीक्षेनंतर, CBSE बोर्डाने अखेर सोमवार, १३ मे रोजी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. CBSE 2024 बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बोर्डानेही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश मिळणार आहे.