TIMES NOW MEGA EXCLUSIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखात, मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, पाहा 6 मे रोजी रात्री 9 वाजता

Times Now Navbharat Mega Exclusive: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार रणधुमाळी सुरू असताना आमची उत्तम वाटचाल सुरू असून आम्ही अगदी सहज 400 जागा जिंकूल, असा दावा भारतीय जनता पक्षाने (BJP) दावा आहे. दरम्यान,' टाईम्स नाऊ नवभारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरं दिली. तसेच त्यांची दूरदृष्टी काय आहे, याबाबतही भाकीत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेगा एक्सक्लुसिव्ह इंटरह्यु उद्या (6 में), म्हणजेच सोमवारी रात्री 9 वाजता टाईम्स नाऊ नवभारतवर प्रसारित होणार आहे.

पीएम मोदींनी व्यक्त केले अनेक ज्वलंत विषयांवर मत..

टाईम्स नाऊ आणि टाईम्स नाऊ नवभारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आरक्षण, हुकूमशाही, राज्यघटना, राज्याला असलेला धोका तसेच अर्थव्यवस्था, महागाई, सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांचा कार्यक्रम, पाकिस्तान, दहशतवाद, समाननागरी कायदा, महिला सुरक्षा त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांसह अनेक ज्वलंत विषयांना हात घातला. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर रोखठोक उत्तरं दिली. तसेच देशासमोर कोणकोणती आव्हानं आहेत, यावरही पंतप्रधानांनी आपलं मत व्यक्त केलं.

पंतप्रधान दोनदा झाले भावुक..

नाविका कुमार या मुलाखतीबाबत म्हणाल्या, पीएम मोदी यांनी या विशेष मुलाखतीत त्यांचे वैयक्तिक अनुभव देखील शेअर केले. त्यावर सविस्तर चर्चा केली. चर्चा करताना पंतप्रधान दोनदा भाउक झाले. विरोधक वारंवार त्यांना 'इस्लामोफोबिक' आणि मुस्लिम विरोधी असे संबोधित आहेत. त्यावरही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. पीएम मोदी केवळ बिनधास्तच नाहीत तर ते प्रामाणिकही आहेत.

2024-05-05T17:37:58Z dg43tfdfdgfd