Trending:


Devendra Fadnavis: फडणवीसांकडून चहावाल्याला शपधविधीचं आमंत्रण; बावनकुळेंनी सांगितली ३ वर्षांपूर्वीची खास आठवण

Maharashtra Politics: मुंबईच्या आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही.


Crime News : फ्लेक्स लावल्याच्या कारणावरून बेदम मारहाण

आ. अमोल खताळ यांचा फ्लेक्स लावल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली. पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मारहाण करणारे हे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, गोविंद यादव पानसरे यांचा पुणे येथे कॉन्ट्रक्टचा व...


Onion News | कांद्यावरील आयात शुल्क कपातीमुळे शेतकऱ्यांना फायदा; निर्णयाचे स्वागत

लासलगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारने रविवारी (दि. १) घेतलेल्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. कांद्यावरील आयात शुल्क ३० टक्यांवरून १० टक्के केल्याने कांदा निर्यातदारांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात जाऊ शकेल. या निर्णयामुळे कांद्याला दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. राज्या...


Kashi Express Fire News | घोटी स्थानकात काशी एक्स्प्रेसच्या इंजीनमध्ये आग

घोटी / इगतपुरी : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मुंबई- गोराशी एक्स्प्रेसला घोटी रेल्वेस्थानक दरम्यान सोमवारी (दि. 2) सकाळी धावत्या रेल्वे इंजीनमध्ये आवाज होऊन आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रेल्वे प्रशासन व इगतपुरी नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळल...


Raigad | रोजगारनिर्मिती योजनेकडे खासगी बँकांची पाठ

रायगड : एक उद्योग सुरु झाला तर किमान पाच जणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ शकतो या सूत्रा नुसार जिल्ह्यात रोजगारांची निर्मीती करण्याच्या हेतूने निवडणूकांच्या पूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राज्यात आणली. जिल्ह्यातील सरकारी व खासगी बँकाच्या वित्त सहाय्यातून ही योजना अमलात आणण्याचे नियोजन करुन रायगड जिल्ह्यास 1000 रोजगार...


Pune: महाविद्यालयीन मुलांची फिल्मीस्टाइल हाणामारी

राजगुरुनगर येथील महाविद्यालयाच्या लगत असलेल्या श्रीसिध्देश्वर मंदिर परिसरात तरुण मुलांच्या दोन गटात पूर्वीच्या भांडणातून सोमवारी (दि.2) सकाळी फिल्मीस्टाइल हाणामारी झाली. मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या एक गटावर दुसर्‍या गटाने अचानक येऊन दगड, कोयता व लाथाबुक्कीने बेदम मारहाण केली. यातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. परंतु गेले काही दिवसांपासून महाविद्या...


MPSC Exam Question: मद्यपानासाठी मित्र आग्रह करेल तर तुम्ही काय कराल? MPSC चा अजब प्रश्न व्हायरल

MPSC Exam Question: राज्यभरातील विविध केंद्रावर गेल्या रविवारी (1 डिसेंबर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात आली. धक्कादायक म्हणजे परीक्षेत मद्यपानाबाबत अजब प्रश्न विचारण्यात आला होता. आता हाच प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया एमपीएससीच्या परीक्षेत नेमका कोणता प्रश्न विचारण्यात आला होता...


नियोजित नवरदेवाचा खून

बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी एका २८ वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला.


ABP Majha Headlines : 10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर (Uttam Jankar) आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात लढत झाली. या लढतीत उत्तम जानकर यांनी बाजी मारली. मात्र, आता उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केलाय. मतदानानंतर मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपला 64 हजार मते मिळाली होती. या वेळेला 54,000 मते मिळाली. मात्र मशीनमधील व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपकडे वळत असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते मशीनमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.


कोलकत्ताचा कर्णधार मुंबईकर?

​​कोलकत्ताचा कर्णधार मुंबईकर? ​


thane Accident case: विचित्र अपघातात तरूणाचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी भागात सोमवारी एका विचित्र अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला. मंजने प्रजापती असे त्याचे नाव असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Nana Patekar : ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही...; राजकीय नेत्यांवर नाना पाटेकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Nana Patekar on Politicians : मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, हे अगदी वारंवार म्हटलं जातंय. या राजकीय परिस्थितीवर अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांनी भाष्य केलं. त्याचप्रमाणे ही परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचंही अनेकजण म्हणतात. पण ही परिस्थिती सुधारण्यासाठीचे प्रयत्न मात्र कुणाकडूनच होत नाही, हेही तितकंच खरंय. आता या सगळ्यावर अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी भाष्य करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली....


EVM विरोधात वंचित उभारणार जनआंदोलन, राज्यभरात स्वाक्षरी मोहीम

EVM ,


CTET Pre Admit Card: CTET परीक्षेचे हॉलतिकीट जारी, ctet.nic.in वर असे करा चेक

CTET Exam City Slip 2024 Download Link: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर 2024 साठी तारीख आणि परीक्षेचे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ctet.nic.in या व्यतिरिक्त सूचना दिलेल्या डायरेक्ट लिंकवरून CTET परीक्षा हॉलतिकीट 2024 पीडीएफ डाउनलोड करता येईल.


Weather Update: डिसेंबर ते फेब्रुवारी कडाक्याची थंडी

Latest Weather Update News: डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत यंदा सरासरी किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी राहील. डिसेंबरचा पहिला आठवडा कमी थंडीचा राहील. मात्र 8 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे....


पालघरमध्ये पोषण आहारात आढळल्या अळ्या

बोईसर : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक तीन या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बारमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो. मात्र हा खळबळजनक प्रकार उघड येताच या प्रकारानंतर 1 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त 1 केला आहे. त्या...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा देण्याची अजित पवार यांची कथित स्मार्ट खेळी आता त्यांच्यासाठीच अडचण ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण, सोमवारी अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला तत्परतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का, अशी कुजबुज सुरु आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत बसण्याची वेळ आल्याचे सांगितले जाते. राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु असणाऱ्या दबावतंत्रामुळे आपल्या वाटच्या खात्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अजित पवारांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठल्याची चर्चा होती. अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांना भेटायला आले होते. मात्र, अमित शाह हे अजित पवार यांना न भेटता चंदीगढला निघून गेले. चंदीगढमध्येय फौजदारी कायद्यासंदर्भातील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघेही हजर होते. त्यामुळे अजित पवार यांना दिल्लीत ताटकळत बसावे लागले. अमित शाह यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित आहेत. अमित शाह यांची भेट घेण्याच्या उद्देशाने या सगळ्यांची एक बैठक झाली होती. मात्र, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी चंदीगढला निघून गेल्यामुळे अजितदादांना दिल्लीतील मुक्काम वाढवावा लागला.


Jejuri News: चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ

महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्‍या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ झाला असून, करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना करण्यात आली. सोमवारी (दि. 2) श्री खंडोबा मंदिरात देवाची पूजा अभिषेक झाल्यानंतर उत्सवमूर्तींची वाजतगा...


Aadhaar Card Update : आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलायचाय? मग कसा कराल अर्ज, काय आहे प्रोसेस? घ्या जाणून

Update Your Aadhaar Card Number : शाळेत प्रवेश घेताना, नोकरीवर रुजू होताना, तसेच बँकेच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. पण, तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे की नाही ते अनेकदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पाठवला जाणारे OTPs निष्क्रिय (inactive) नंबरवर पाठवले जातात...


Nagar : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

तालुक्यातील काष्टी येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. काष्टी येथेील शेतकरी महादेव खटावकर यांच्या विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पडला. सकाळी शेतकर्‍यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी वन विभागाला कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी दौंड येथील इको रेस्क्यू वन्यजीव बचाव प...


दगडी कोळसावाहू ट्रकला आग

देवरुख : रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील दाभोळे घाटात रविवारी सायंकाळी सुमारे 4.50 च्या दरम्यान दगडी कोळशाने भरलेलल्या 14 चाकी ट्रकला अचानक आग लागली. ही बाब देवरुख नगर पंचायतीला समजताच अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरून दगडी कोळसा घिऊन के. ए. 28 डी 7224 हा ट्रक निघाला होता. दाभोळे येथे या ...


Mumbai Water Pipeline Burst : मुंबईतील वांद्रेत पाण्याची मोठी पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

Water Pipeline Burst In Bandra : वांद्रे येथे पाण्याची मोठी पाइपलाइन फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पाइपलाइन फुटल्याने परिसरात दाणादाण उडली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.


Ajit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण माझाच्या हाती

Ajit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण माझाच्या हाती महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण, महाराष्ट्रात सरकार स्थापनेची कसरत आता दिल्लीत सुरू झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नेत्यांच्या आणि आपल्या पक्षांच्या आमदारांच्या भेटी नाकारत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत पोहोचले आहेत. मुंबईत शपथविधीची जय्यत तयारी सुरू असताना अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत का गेले याबाबतची चर्चा आहे, मात्र, अजित पवारांची दिल्ली वारी कशासाठी याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी (Ajit Pawar) स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढवून हवी असल्याच्या मागणीसाठी भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्ली वारी केल्याचं समजतंय. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्ली वारीचं कारण एबीपी माझाच्या हाती आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढवून हवी आहेत. जेवढी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मंत्रिपद मिळावीत अशी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाची भूमिका आहे. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्रीपद वाढवण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार सध्या दिल्लीत आहेत. मात्र, अद्याप अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार (Ajit Pawar) वेटिंगवर आहेत. मंत्रीपदाच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.


Dhule News | धुळ्यात जंतनाशक मोहिमेचे आयोजन

धुळे | धुळे जिल्ह्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेत आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करीत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देवून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हास्तरीय सम...


Shiv Sena MP Call to Shinde :'साहेब तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे'

नवी दिल्ली: महायुतीमध्ये मंत्रिपदावरुन आणि महत्त्वाच्या पदांवरुन रस्सीखेच सुरु असताना शिवसेना खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केलाय. शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, अशी आग्रही मागणी खासदरांनी यावेळी केली. तसेच तुम्ही मंत्रीमंडळात सहभागी झाला नाही तर काय परिणाम होईल याची देखील कल्पना दिली आहे.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार नाही अशी चर्चा सध्या राजकरणात रंगली आहे. या सर्व चर्चांच्या...


Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेग

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. तर राज्याच्या गृहखात्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Faction) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात, असे ट्विट केले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केलाय. संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली. यावर संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेले पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित दिलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला शपथविधीची तारीख जाहीर करतात. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते, हा काय प्रकार सुरू आहे? या ठिकाणी आम्ही असतो आणि इतका उशीर झाला असता तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती, असे त्यांनी म्हटले.


Deepak Badgujar News : दीपक बडगुजर पोलिसांसमोर हजर होईना

नाशिक : माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने सशर्त जामीन दिलेल्या दीपक सुधाकर बडगुजर पोलिसांसमोर हजर हाेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दीपकचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजुर करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात मोक्का कायद्यानुसार अटक केलेल्या सहा संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनाव...


NMC Election | भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी

नाशिक : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशामुळे विरोधी पक्ष कोमात गेले असताना, भाजपने आतापासूनच महापालिका निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सदस्यता नोंदणी अभियान राबविले जात असून, त्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समिती संयोजकपदाची सूत्रे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी नाना शिलेदार यांच्याकडे सोपविली आहेत. विध...


Maharashtra CM Oath Ceremony: शपथविधी सोहळ्याला देशभरातील नेते उपस्थित राहणार

मुंबई : महायुतीचा शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्याला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. शपथविधीसाठी भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा...


पुणे : पत्नीकडून एकाला लाटण्याने बेदम मारहाण, करंगळीचा चावा घेऊन दुखापत; पत्नीविरुद्ध गुन्हा

पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केल्याची घटना सोमवार पेठेत घडली.


Political News | शिंदेंच्या घराबाहेर गाडी अडवताच विजय शिवतारेंचा संताप

Vijay Shivtare Angry For Police Stopped Car At Eknath Shinde residence