मुंबई : SSPE या आजाराने त्रासलेल्या मुलं, त्यांचे हाल बघून हतबल झालेले पालक आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले सल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्यामुळे पालकांनी आक्रमव पवित्रा घेत तिथल्या फुटपाथवरच आंदोलनाला सुरुवात केली. मुलांना लस मिळत नाहीय, मुलं आजारी पडत असल्याचं पालक म्हणाले. आजारी मुलं थेट रस्त्यावर आल्याने अनेक पालकांना आपले अश्रु अनावर झाले आहेत. ''आम्हाला पैसे नको, तर सुदृढ आरोग्य द्या'', असा घाट घालत मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी आंदोलन केले.
त्यानंतर,उर्मिला चव्हाण म्हणाल्या की, माझ्या मुलाचे नाव देवांश आहे. माझा मुलगा बेडवर बसून आहे. अचानक तो आजारी पडला, त्याला बोलता येत नाहीय, त्याला वाकडी आलीय. त्याला SSPE आजार झाला आहे. अचानक ताप आला आणि त्याला आकडी आली. रुग्णालयात गेलो तर त्याच्या डोक्यात ताप गेल्याचं डॉक्टरांनी सांगितले. त्याला रुग्णालयात दाखल केले होते. सर्व चाचणी केल्या पण आजार कळला नाही. आमच्या मुलावर उपचार करा एवढीच मागणी आहे. सरकारने लक्ष द्यावे, या आजाराने दीड ते दोन हजार मुले आहेत. असा आकांत आणि आक्रोश पालकांचा सह्याद्री अतिथीगृहाबाहेर दिसतोय. आता सरकार यावर काय पाऊलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-10-02T06:35:44Z dg43tfdfdgfd