RAJ THACKERAY : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Maharashtra politics : राज ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. राज ठाकरेंनी महायुतीसाठी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत जाहीर सभा घेतली आणि इकडं त्यांच्या शिलेदाराने मनसेला 'जय महाराष्ट्र' करत उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केला. मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (kirtikumar shinde) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताच शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राज ठाकरेंच्या इंजिनाची साथ सोडतं, उद्धव ठाकरेंची (shiv sena uddhav Thackeray group) मशाल हातात घेतली आहे.

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. राज ठाकरेंचा हा निर्णय न पटल्याने मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला होता. यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे.

राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला तरी महायुतीच्या कोणत्याही उमेदवारासाठी सभा घेतली नव्हती. मात्र शनिवारी राज ठाकरेंनी कणकवलीत नारायण राणेंसाठी प्रचार सभा घेत त्यांच्यासाठी लोकांना मते देण्याचे आवाहन केले. शनिवारी राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली अन् इकडे त्यांच्या शिलेदाराने मोठा धक्का देत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्टही शेअर केली आहे.

2024-05-05T11:52:05Z dg43tfdfdgfd