रायगड : सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातून 282 ज्येष्ठ नागरिक अयोध्या दर्शनाकरिता जाणार असून त्यांच्या सुरक्षित प्रवासाकरिता समाजकल्याण विभागाचे 52 कर्मचारी सहाय्यक म्हणून तैनात राहाणार आहेत. दरम्यान मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होणार आहेत.
राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वा त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरीकांची तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्हयातून 150, मुंबई उपनगर या जिल्हयातून 306 व ठाणे जिल्हयातून 471 इतके अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्हयातून 800 व रायगडमधून 281 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील या 281 ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वाधिक 140 ज्येष्ठ नागरिक पनवेल तालुक्यांतील आहेत, तर मुरूड मधील 75, महाडमधील 34 आणि तळा तालुक्यांतील 32 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या ज्येष्ठ नागरिकांकरिता विशेष ट्रेन 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता मुंबई येथून रवाना होईल व 8 ऑक्टोबर रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर इ. साठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातून एकूण 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होणार आहेत.
2024-10-02T07:11:04Z dg43tfdfdgfd