Trending:


VIDEO | लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

Fifth Phase Of Lok Sabha Election Campaign To End Today


Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...

Rakhi Sawant Health Updates : राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. मात्र, तिचा पूर्व पती रितेशने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. राखीला...


अमोल कोल्हेंची धुळ्यात धडाडली तोफ, विरोधकांवर हल्लाबोल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- इंडिया महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेचे धुळ्यातील इंदिरा उद्यान येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. देशातील सुशिक्षित तरुणांना ऑनलाइन गेमच्या माध्यमातून उध्वस्त करण्याचे रॅकेट या देशात वाढले …


पावसाची गॅरंटी

Monsoon 2024: ​​साधारण मे महिन्याच्या मध्यावर मान्सूनच्या आगमनाचा एक अंदाज जाहीर होत असतो; तो तसा बुधवारी जाहीर झाला. त्या अंदाजानुसार, केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. ही तारीख चार दिवस इकडे-तिकडे होऊ शकते.


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या गर्भपात जाळे चालवणारी आशा कार्यकर्तीसह तिघे अखेर गजाआड

वाळूजनजीकच्या बकवालनगरात आशा कार्यकर्तीने चालविलेले गर्भपात प्रकरण गंगापूरच्या आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले होते. यातील मुख्य आरोपी महिला कार्यकर्ती पसार होती.


Supreme court on election commission: मतदान आकडेवारीवर तातडीने सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाची सहमती

Supreme court on election commission: स्वयंसेवी संस्थेने आपल्या सन २०१९ च्या जनहित याचिकेत अर्ज दाखल करून निवडणूक आयोगाला सर्व मतदान केंद्रांच्या ‘फॉर्म १७ -सी’ भाग-१च्या स्कॅन केलेल्या प्रती मतदानानंतर अपलोड करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


पक्ष्यांचे जीवनमान बदलतेय!

भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये जंगलांत आगी लागण्याच्या 342 घटना देशभरात घडल्या. याचा फटका पक्ष्यांना बसला आहे. याचे कारण मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. गेल्या काही वर्षांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे जीवनमान बदलत आहे. खासकरून उत्तरेकडील थंड देशातून उष्णकटिबंधीय प्रदेशात येणार्‍या प्रवासी पक्ष्यांना तापमानवाढीची झळ बसली आहे. याचे कारण प्रवासी …


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Loksabha election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

CM Eknath Shinde Serious Allegation On Uddhav Thackeray


Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारी बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहेत. आजच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडतायेत हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी


ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य ((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण मात्र गुलदस्त्यातच ((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर ((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))


Adi Shankaracharya 2024 : महान आदि शंकराचार्यांनी प्रेरित 10 बाळांची नावे

आदि शंकराचार्य ज्यांना जगतगुरु शंकराचार्य म्हणूनही ओळखले जाते. हिंदूंना संघटित करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. आदि शंकराचार्य यांचीदरवर्षी त्यांच्या भक्तांद्वारे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी जयंती साजरी केली जाते. आदि शंकराचार्यांची 1236 वी जयंती रविवार, 12 मे 2024 रोजी साजरी झाली. या निमित्ताने त्यांच्या नावावरुन मुलांची खास नावे.


Global Extinction Species Day Special | ’डोडो’ पक्षी आता उरला फक्त चित्रात!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंदी महासागरात सापडणारा डोडो पक्षी सुमारे 400 वर्षांपूर्वी नामशेष झाला. त्यावर आपण काहीच उपाय न केल्याने आता तो फक्त चित्रात दिसतो. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील 1500 पेक्षा जास्त प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगात 27 ते 50 टक्के पशू, पक्षी आणि विविध प्राण्यांच्या जाती लुप्त होत असल्याची चिंता यानिमित्ताने तज्ज्ञांनी व्यक्त …


Pune Mumbai Expressway: प्रवाशांनो लक्ष द्या, आज आणि उद्या पुणे-मुंबई एक्सप्रेसवे या कालावधीसाठी बंद राहणार

Pune Mumbai Expressway Close Update: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) काही काळासाठी बंद राहणार आहे. या एक्सप्रेसवेवरील पुणे वाहिनीवर गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग बंद असेल. याचा फटका वाहनचालकांना बसणार आहे.


Swati Maliwal Latest Marathi News: मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, नेमकं काय घडलं?

Swati Maliwal Latest Marathi News: आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


Sharmila Thackeray : बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला... राज ठाकरेंच्या भाषणावर शर्मिलांची प्रतिक्रिया

Sharmila Thackeray : बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती, की मला जर काँग्रेससोबत जायला लागलं, तर मी माझा पक्ष बंद करेन, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


पुन्हा मुलींची बाजी!

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईचा निकाल यंदाही उत्साहवर्धक राहिला आहे. या निकालाच्या डेटाचे विश्लेषण करण्याबरोबरच त्याच्या सामाजिक पैलूंचीही चर्चा होणे स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रेंडनुसार यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाणही चांगले असले, तरी मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बारावी परीक्षेच्या निकालात एकूण …


BJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP Majha

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला. हे ही वाचा मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या! Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


Maharashtra Weather Update: सावधान! आज या 4 जिल्ह्यात होणार वादळासह गारपीट, अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजही अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागू शकते. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळासह पाऊस होईल. असे असले तरी काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.