PUNE TRAFFIC ADVISORY: पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल! या पर्यायी मार्गावरून करा प्रवास

Pune Traffic Advisory: पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही प्रवासासाठी, फिरण्यासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. कारण पुणे वाहतूक पोलिसांनी मेट्रोच्या कामासाठी ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे. ही ॲडव्हायझरी 4 मेपासून म्हणजेच शनिवारपासून लागू करण्यात आली आहे. शिवाजी नगर परिसरातील सिमला ऑफिस चौकाजवळ गर्डर टाकण्याचे कामामुळे शहरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याकरिता सिमला ऑफिस चौक व परिसरामधील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा रोहिदास पवार यांनी याबाबत पत्र काढलं आहे. काम सुरू झाल्यावर बाधित होणाऱ्या मार्गांची यादी येथे खाली सविस्तरपणे दिली आहे. तुमच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी, वाहतूक कोंडी अनुभवायची नसेल तर हे पर्यायी मार्ग लक्षात ठेवा. पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

1. वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. वी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एस.टी. स्टँड मार्ग) असा सर्व वाहनांकरीता एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू राहिल.

2. वीर चाफेकर उड्डानपुलावरुन सिमला ऑफिस चौकाकडे वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - चाफेकर उड्डाणपुलाचे डाव्या बाजूकडील सर्व्हिस रस्त्यावरुन चाफेकर चौक-डावीकडे वळण घेऊन - न.ता.वाढी उजवीकडे वळण घेवून सिमला ऑफिस चौककडे.

3. फर्ग्युसन कॉलेज रोडवरुन विर चाफेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यास प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - चाफेकर चौक- सरळ न.ता.वाडी चौक उजवीकडे वळण घेवून सिमला ऑफिस चौक

4. न. ता. बाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश बंद राहील

पर्यायी मार्ग - न.ता. वाडी चौक डावीकडे बळण घेवून सरळ सिमला ऑफिस चौक उजवीकडे वळण घेवून चाफेकर चौक.

5. स. गो. बर्वे चौकाकडून येवून सिमला ऑफिस चौकामधून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - सिमला ऑफिस चौक डावीकडे वळण घेवून चाफेकर चौक उजवीकडे वळण घेवून न.ता. वाडी चौक उजवीकडे वळण घेवून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन.

7. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन कडून येऊन एस. टी. स्टॅन्ड सर्कल वरुन न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

7. सिमला चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल.आय.सी कडील बाजूला जावून चाफेकर उड्डाण पुलावरुन जावे.

8. वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्कींग करण्यात येत आहे.

2024-05-05T08:29:03Z dg43tfdfdgfd