Trending:


Anil Desai Opposed by Congress : अनिल देसाईंसह काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, वाद चव्हाट्यावर!

मुंबई : मुंबईतील महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येतंय, मविआमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.


गालिचासारखी दिसणारी आकाशगंगा

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे, अशा अनेक सौरमालिकांना सामावून घेणार्‍या आपल्या आकाशगंगेचे नाव ‘मिल्की वे’ आहे. ‘मिल्की वे’सारख्या असंख्य आकाशगंगा या अंतराळाच्या अनंत पसार्‍यामध्ये आहेत. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. आता ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीने चक्क गालिचासारख्या दिसणार्‍या एका अनोख्या आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे. ही आकाशगंगा पृथ्वीपासून 60 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. …


Maratha Reservation : सॉरी मम्मी-पप्पा...! 25 वर्षीय मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल; भावाला व्हॉट्सअ‍ॅप करत संपवली जीवनयात्रा

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही. तर दुसरीकडे दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवलीय. हे कृत्य करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता...


Hemadpanti Temple Pandharpur : उजनीच्या उदरात दडलेला हेमाडपंती मंदिराचा ठेवा Exclusive

Hemadpanti Temple Pandharpur : उजनीच्या उदरात दडलेला हेमाडपंती मंदिराचा ठेवा Exclusive सध्या दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली असून उजनी धरणाची पाणीपातळी वजा पन्नास टक्के एवढी खालावल्याने उजनीच्या उदरात जलसमाधी मिळालेल्या अनेक पुरातन वास्तू आणि पुरातन मंदिरे उघडी होऊ लागली आहेत . या जुन्या पुरातन वास्तू पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले उजनी धरणाकडे वाळू लागली आहेत . उजनी धरणाचे बांधकाम झाल्यावर १९७५ साली परिसरातील अनेक पुटं मंदिरे आणि वास्तू उजनीच्या उदरात गडप झाल्या होत्या . यंदा झपाट्याने उजनीचे पाणी पातळी खालावू लागल्याने या पुरातन वास्तू आणि मंदिरे पूर्णपणे बाहेर आली आहेत .


बिजदची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी

ओडिशात यावेळी सर्वच मतदार संघांत तिरंगी लढती होत आहेत. खरा मुकाबला सत्तारूढ बिजू जनता दल आणि विरोधी भाजप यांच्यातच होत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी असे स्वरूप येथील राजकीय लढाईला आले आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये सत्तारूढ बिजदला भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसही सर्व जागा लढवत असून, त्यामुळे चुरस …


उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या …


Sudhakar Badgujar यांना सलीम कुत्तासोबतच्या डान्स प्रकरणात तडीपारीची नोटीस

Sudhakar Badgujar यांना सलीम कुत्तासोबतच्या डान्स प्रकरणात तडीपारीची नोटीस Nashik News : नाशिक : नाशिकचे (Nashik News) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नाशकातून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.


Prithviraj Chavan on Congress Merger : लोकसभेनंतर दोन पक्ष राहणार नाहीत, चव्हाणांचा रोख कुणावर?

Prithviraj Chavan on Congress Merger : लोकसभेनंतर दोन पक्ष राहणार नाहीत, चव्हाणांचा रोख कुणावर?


IRCTC Himachal Package: बॅग भरा आणि मित्रांसोबत चला शिमला-मनालीला; 8 दिवसांचं जबरदस्त पॅकेज लॉन्च

IRCTC Himachal Package: उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी तुम्ही कुठे हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण आम्ही येथे तुम्हाला आयआरसीटीसीच्या एका खास आणि बजेट पॅकेजची माहिती देत आहोत. तुम्ही मित्रांसोबत, कुटुंबासोबत आणि पत्नी किंवा गर्लफ्रेन्डसोबतही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.


ABP Majha Headlines : 09 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पक्ष फुटले तेव्हा ते झोपले होते का?, ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते देश काय सांभाळणार?.. एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि पवारांवर खरमरीत टीका.. घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो.. महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी..तर मुंबईकरही मोठ्या संख्येने रस्त्यावर मोदींच्या रोड शोला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर.. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार देवगिरी निवासस्थानी.. ७० हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल?, नाशिकमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल काश्मीरमधला लिथीयमचा साठा अदानींना मिळावा म्हणूून कलम ३७० हे काढलं.. नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा मोदींवर नवा आरोप.. तर नकली संतानच्या टीकेवरुनही पलटवार.. कांदाप्रश्नी छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र.. कायमस्वरूपी उपाययोजना करा.. पंतप्रधांना कांद्याबाबत भुजबळांचं साकडं... ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार.. हवामान विभागाचा अंदाज.. १९ मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता.. घाटकोपर अपघातातील मृतांचा आकडा १७ वर, बचावकार्य अजूनही सुरूच, घाटकोपरमधील अपघातग्रस्त पेट्रोलपंपही अनधिकृत असल्याची बाब उजेडात, महसूल खातं, पोलीस गृह मंडळानं नाकारली होती परवानगी फेडरेशन कप २०२४मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राची बाजी.. डीपी मनूला पराभूत करत नीरज चोप्राने जिंकलं सुवर्णपदक


Chandrashekhar Bawankule Meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

महायुतीकडून राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी? बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट मुंबईसाठी महायुतीची काय रणनीती? मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी


PM Modi Nashik Sabha Speech : नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, मोदींचा मोठा दावा

PM Narendra Modi नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार, असे त्यांनी म्हटले. नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि भारती पवार (Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


Ajit Pawar Shirur : Chandrakant Patil यांनी शरद पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं : अजित पवार

Ajit Pawar Shirur : Chandrakant Patil यांनी शरद पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं : अजित पवार पुणे: चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य हे चूक होते. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते गुरुवारी शिरुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी थेटपणे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खडे बोल सुनावले. शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.


हवामान संकटावर ‘एआय’चा उतारा

Global Warming: जागतिक तापमानवाढीवर मार्ग काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान साह्यभूत ठरणार आहे. जगात त्याचा वापरही सुरू झाला आहे आणि त्याचे परिणाम दिलासादायी आहेत.


धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.


Loksabha election | उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटीस बजाविण्यास सुरुवात

पुणे : पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (13 मे) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक 74 लाख 97 हजार रुपये प्रचार खर्च हा शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. त्याखालोखाल पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये खर्च केला आहे. शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 53 लाख …


VIDEO | असली-नकलीवरुन ठाकरे-मोदींमध्ये जुंपली

Loksabha Election 2024 Modi VS Uddhav Nakli Shivsena


Melghat Water Scarcity: मेळघाटला टंचाईच्या झळा, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट, प्रशासनाचे दुर्लक्ष

Melghat Water Crisis: यंदा चौरामल, धरमडोह, बेला, गौरखेडा बाजार, मोथा व खडीमल या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.


घाटकोपरमध्ये अडीच किलोमीटरपर्यंत पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो

Prime Minister Modi's grand road show for two and a half kilometers in Ghatkopar


Sharad Pawar Congress Special Report : शरद पवार विलिनिकरणाची तुतारी फुंकणार? सखोल विश्लेषण

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.