PATRA CHAWL CASE : संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई, 73.62 कोटीची मालमत्ता जप्त

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांवर ईडी कारवाईचा (ED Action) फास आवळला आहे. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने (ED) कारवाई करत प्रवीण राऊत (Pravin Raut) याची मालमत्ता जप्त (Property Seized) केली आहे. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणी ईडीने प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त (Pravin Raut Property Seized by ED) केली आहे. ईडीने पत्राचाळ कथित मनी लॉड्रिंग (Money laundering) प्रकरणात ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई

ईडीने प्रवीण राऊत यांच्यासह इतर भगिदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता ईडीकडून जप्त केली आहे. ईडीने 73.62 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 116.27 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएमएलए कायदा 2002 च्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

2024-04-24T10:35:40Z dg43tfdfdgfd