NASHIK NEWS | रॅपलिंग करणाऱ्या पर्यटकांवर मधमाशींचा हल्ला

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरिहर किल्ला परिसरात असलेल्या शितकडा धबधबा येथे रॅपलिंग करणाऱ्या पर्यटकांवर मधमाशींनी हल्ला केला. यात काही पर्यटक जखमी झाले आहेत.

याबाबत हरिहर किल्ला परिसरातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २९) त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या आणि ट्रेकींगसाठी आकर्षण असलेल्या हरिहर किल्याच्या रस्त्यावर कळमुस्ते शिवारातील उंभ्राडे वस्तीच्या वरच्या बाजूस शितकडा धबधबा आहे. शितकडा धबधबा येथे रॅपलींग करण्यासाठी पर्यटक आले होते. यात तामिळनाडूसह राज्यातील सुमारे 25 पर्यटक होते. त्यांनी दोर बांधून रॅपलींग सुरू केले. दरम्यान या पर्यटकांच्या साहसाचे ड्रोन चित्रीकरण करण्यात येत होते. ड्रोनच्या आवाजाने डोंगराला असलेल्या मधमाशा विचलीत झाल्याने त्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यानंतर सावध झालेल्या पर्यटकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला तर काही माहितीगार असलेल्या एक दोघांनी जवळ असलेली वेखंडाची पावडर अंगावर चोपडली. नेमके त्याच वेळेस पावसाला सुरुवात झाल्याने मधमाशा परत गेल्या. चार पाच पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.

2024-10-01T03:42:35Z dg43tfdfdgfd