NASHIK CRIME : नाशिकमध्ये हायप्रोफाइल सोसायटीतील कुंटणखाना प्रकरणी बड्या राजकीय नेत्याला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Nashik Crime News : नाशिक येथील तपोवन येथे एका उच्चभ्रू सोसायतीत हाय प्रोफाइल कुंटणखाना प्रकरणी नाशिक क्राइम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. मात्र, हा कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेच्या मागे राजकीय वरदहस्त होता. ही महिला स्थानिक नागरिकांना दमबाजी करत होती. पोलिसांनी थेट राजकीय नेत्यालाच या प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पवन क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर या पूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपोवन कपालेश्वरनगर येथील एका उच्चभ्रू असणाऱ्या नक्षत्र सोसायटीत एका महिलेने कुंटणखाना सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून दोन पीडित मुलीना अटक केली होती. तर आरोपी महिला व एका दलालाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी आता पवन क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी महिला स्थानिक नागरीकांवर दादागिरी करत होती. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना बातमीदारांकडून या बाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्रल यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करत कारवाई केली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली होती. हा कुंटणखाना चालवणारी कविता साळवे-पाटील व तिच्या साथीदार जाफर मन्सुरी यास अटक करण्यात आली होती.

Ganesh Chaturthi 2024 : नेते बाप्पाच्या चरणी! उद्धव ठाकरे यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पाहा व्हिडिओ

या दोघांच्या अटकेनंतर आता पोलिसांनी आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागरला अटक केली आहे. पवन क्षीरसागर यांच्या पाठिंब्याने कविता साळवे पाटील या सोसायतीत वैश्या व्यवसाय चालवत होती. या कारवाईने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Mulund Accident: रस्त्यावर बॅनर लावताना बीएमडब्लू कारनं दोन जणांना चिरडलं, मुंबईतील मुलुंड येथील घटना!

ही महिला या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना त्रास देत होती. ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशी देखील या महिलेने सोसायटीतील फ्लॅट धारकांना शिवीगाळ व दमदाटी केली. यामुळे रहिवाशांनी संतप्त होत थेट या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आंदोलन करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट! मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ५ ठार

2024-09-07T11:58:02Z dg43tfdfdgfd