NASHIK CRIME : रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबड येथील मैफील बार ॲण्ड रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. ललित राजू कदम असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

अशोक काच्छेला हे २९ जानेवारी रोजी रात्री त्यांचे हॉटेल बंद करत असताना संशयिताने त्यांच्याकडे मद्याची मागणी केली. मात्र, काच्छेला यांनी त्यास मद्य देण्यास नकार दिल्याने संशयिताने काच्छेला यांच्यासह दोन मुलांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी ललित हा फरार होता. गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गणेश नागरे यांना ललित गंगापूर रोडवर येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ललितला मंगळवारी (दि.३०) पकडले.

ललितचा ताबा अंबड पोलिसांना देण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, सुनील आडके, राजेश सावकार, प्रदीप ठाकरे, मिलीन जगताप आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा :

The post Nashik Crime : रेस्टॉरंटच्या मालकावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड appeared first on पुढारी.

2023-06-01T04:25:02Z dg43tfdfdgfd