NAGPUR CRIME| मामेबहिणीशी संबंधाच्या संतापातून सुदामनगरीत तरुणाची हत्या

नागपूर: अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत सुदाम नगरीत हत्येची घटना घडली. मृतकाचे नाव सागर नकुल नागले उर्फ टूनां (वय 27 वर्ष) असे आहे. सोमवारी रात्री 10.30 ते 11.30 वाजताचे सुमारास सुदामनगरी, पांढराबोडी हनुमान मंदिराच्याजवळ बंटी देविदास उईके यांच्या घरात ही घटना घडली.

मामेबहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संतापातून ही घटना घडली. मोलमजुरी करणाऱ्या या आरोपीची नावे वीर विनोद थापा (वय 18 वर्ष,) रा. पांढराबोडी, अजित संतन नेताम (वय 26 वर्ष), रा. सुदामनगरी, सुरेश मनोहर यादव (25 वर्ष), रा. सुदामनगरी अशी असून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी व मृतक हे बंटी उईके याच्या घरात दारू पीत बसले असताना मृतकाने वीर याच्या मामेबहिणीसोबत अफेअर असून, आपले शारीरिक संबंधही असल्याचे सांगितले. याच गोष्टीचा संताप अनावर झाल्याने वीर थापा याने सोफ्याखाली ठेवलेला सिमेंटचा गट्टू उचलून सागर याच्या डोक्यात घातला. याचप्रकारे इतर दोन मित्रांनी देखील गट्टू उचलून पुन्हा पुन्हा डोक्यात घातला, त्यानंतर ते तिघेही पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस डीबी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीममार्फत पंचनामा करण्यात आला व मृतदेह मेडिकल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.

2024-10-01T09:41:12Z dg43tfdfdgfd