MUMBAI SUPERFATS NEWS : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 02 OCTOBER 2024 : ABP MAJHA

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ऑक्टोबरला घोडबंदरच्या कासारवडवली भागात दौरा, घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्याचा निर्णय. 

गोविंदाच्या जबाबावर पोलीस समाधानी नसल्याची माहिती, रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर गोविंदाने स्वत:चं दाबल्याचा पोलिसांना संशय,

गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची पत्नी सुनीता अहुजा यांची माहिती, गोविंदाला आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. 

अभिनेता गोविंदांचा मुलगा यशवर्धन गोविंदा यांना  भेटण्यासाठी क्रिटी केअर रुग्णालयामध्ये.

अभिनेता गोविंदा यांची मुलगी टीना अहुजा क्रिटी केअर रुग्णालयमध्ये. गोविंदा याची भाची आरती सिंह यांनीही क्रिटी केअर रुग्णालयात जात गोविंदा यांच्या प्रकृतीची केली विचारपूस.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील तोडफोडीचं प्रकरण, मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचं निलंबन, बेशिस्त आणि बेजबाबदारीचा ठपका ठेवून अनिल आवळेंवर कारवाई.

राज्य शासनाद्वारे गरजू विद्यार्थ्यांसाठी साकारण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाचं उपमुख्यमंत्री  फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, ऑनलाईन संकेतस्थळ आणि हेल्पलाईन क्रमांकही सुरु करण्यात येणार. 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भेट, सर्व १० सिनेट सदस्यांचा दानवेंकडून सत्कार. 

बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष शैलेश वडनेरेकडून कंपनी मालकाला मारहाण, कामगारांना कामावरून काढून टाकल्याने मारहाण केल्याची माहिती.

2024-10-02T13:04:58Z dg43tfdfdgfd