लाईफस्टाईल

Trending:


DMRL DRDO Recruitment 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : DRDO अंतर्गत, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी आयटीआय पास अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील येथे पहा.


कुतूहल : जेम्स लाइटहिल

या अहवालात असे संकेत आहेत की बुद्धिबळाच्या खेळात संगणकासारखे यंत्र माणसाला हरवू शकत नाही


Pune Police पुणे पोलीस अ_ॅक्शन मोडमध्ये; पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड

भारत, May 3 -- पुण्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात गैरप्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची धिंड काढून त्यांना तंबी दिली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे.


खडसे राष्ट्रवादीचे आमदार, आधी राजीनामा द्यावा; गिरीश महाजनांनी काढला चिमटा

LokSabha Election Girish Mahajan on Eknath Khadase


मुख्यमंत्र्यांची ठाण्यासाठी मोर्चेबांधणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात ठाण मांडत ठाणे लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चेबांधणी सुरू केली.


Sangli Lok Sabha Election : तमाशाच्या फडातून निवडणुकीची हवा.... सांगली

जगभरात प्रसिद्ध असणारी महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा आणि लावणी. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सांगलीत भर उन्हात तमाशाच्या फडात लावणीचा खेळ चांगलाच रंगला. तमाशाच्या याच फडातून तापलेल्या राजकारणाचा अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी.


Deepak Kesarkar On Devendra Fadnavis | 'ठाकरे म्हणाले, शिंदेऐवजी तुम्ही मुख्यमंत्री व्हा- केसरकर

Deepak Kesarkar On Devendra Fadnavis | Thackeray said, instead of Shinde, you become the Chief Minister - Kesarkar


Nashik Delhi Flight : महाराष्ट्रदिनी नाशिकची दिल्लीत भरारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आलेल्या नाशिक-दिल्ली थेट विमानसेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी तब्बल २९५ प्रवाशांनी उड्डाण घेत, नाशिक-दिल्ली विमानसेवेचे स्वागत केले. यावेळी इंडिगो कंपनीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बऱ्याच काळानंतर नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने, नाशिकच्या विकासाला बळ मिळेल, अशी अपेक्षा उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राकडून व्यक्त …


सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस


छगन भुजबळ प्रचारापासून दूरच

उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही.


बकुळीच्या फुलाचा गंध

परवा सहज म्हणून कपाट उघडले आणि काय व किती लिहिले आहे, याचा धांडोळा घेतला तर अलिबाबाची गुहाच सापडल्याचा आनंद झाला. इसवी सन १९८०च्या सुमारास लेखणी हातात धरली. बालकथा हा माझा अगदी आवडीचा प्रांत. अनेक वृत्तपत्रांतून अनेक बालकथा लिहिल्या. त्या बालकथांचे पुढे पुस्तक झाले. आणि अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुणी भेटून, गोष्ट आवडली म्हणून सांगे; ...


Aadhar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील नावात बदल कसा करायचा? जाणून घ्या प्रोसेस

Aadhar Card Name Change After Marriage: लग्नानंतर मुलींना सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या नावात बदल करावा लागतो. भविष्यातील सरकारी किंवा बॅंकिंग आणि इतर कामांसाठी आधार कार्डावरील नाव बदले गरजेचे असते. आज आपण आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे? यासाठी काय कागदपत्रे लागतात? किती शुल्क लागते? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.


सप्तपदी हवीच...

भारतीय समाजमान्यतेनुसार विवाह हा संस्कार आणि पवित्र बंधन असल्याने त्यात सप्तपदीचे महत्त्व आहे. या ठराविक विधींखेरीज हिंदू विवाहाला मान्यता मिळू शकणार नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.


शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनामुळे ठाणेकर कोंडीत

ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले आहे.


Loksabha Election | उज्ज्वल निकम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Loksabha Election 2024 Ujjwal Nikam form Submission


नवमतदारांच्या नजरेतून..

मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकणाऱ्या आणि नवनवीन योजना राबवू शकणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकडे प्राधान्य असेल.’


Covishield vaccine: कोविशील्डमुळे वाढले हार्ट अटॅकचे प्रकरण? या गोष्टी किती तथ्य

अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधल्या फार्मास्युटिकल कंपनीने अशी कबुली दिली आहे, की त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या कोविड-19 लशीमुळे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात. भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या फॉर्म्युलापासूनच कोविशील्ड लस उत्पादित केली होती. ब्रिटनमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या विरोधात 51 खटले सुरू असून, त्यांपैकी अनेक खटल्यांमध्ये असा आरोप ठेवण्यात आला आहे, की त्या लशीमुळे प्राण गेले आहेत. तसंच अनेक जण गंभीररीत्या आजारी पडले आहेत. या संदर्भात भारतातले डॉक्टर्स काय म्हणतात, याविषयी जाणून घेऊ या. ज्या डॉक्टर्सनी कोरोना महासाथीचा बारकाईने अभ्यास केला होता, त्यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला. आज तकने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की अॅस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात असं सांगितलं आहे, की कोविशील्ड आणि वॅक्सझेवरिया ब्रँडनेमने विकल्या जाणाऱ्या त्यांच्या लशीमुळे टीटीएस अर्थात थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम विथ थ्रोम्बोसिस हा साइड इफेक्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याआधीही कोविडसह अन्य लशींच्या प्रतिकूल प्रभावामुळे अॅक्वायर्ड टीटीएसची नोंद झाली आहे. टीटीएस म्हणजे एक अशी दुर्मीळ परिस्थिती, ज्यात रक्त गोठू लागतं आणि रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट झालेच, तर ते एक ते सहा आठवड्यांत दिसून येतात. त्यामुळे भारतात त्यांनी दोन वर्षांपूर्वी लस घेतली होती, त्यांनी घाबरण्याची काहीही गरज नाही. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहअध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं, की लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्या महिन्यातच साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात, त्यानंतर नाही. डॉ. जयदेवन यांनी असंही सांगितलं, की 'हे सारं ब्रिटनमधल्या माध्यमांनी प्रसारित केलं आहे. लशीमुळे होणाऱ्या टीटीएसवर आधीही चर्चा झाली आहे. डब्ल्यूएचओने मे 2021मध्ये यावर एक रिपोर्टही प्रसिद्ध केला होता.' डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की लशीनंतर टीटीएस झाल्याच्या प्रकाराची अद्याप भारतात नोंद झालेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांत त्याची नोंद झाली आहे. कोविड लसीकरणानंतर टीटीएस होणं खूप दुर्मीळ आहे. ब्रिटन आणि युरोपीय संघात आतापर्यंत 1.7 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली असून, गेल्या आठवड्यापर्यंत टीटीएसची 40 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. डॉ. सुधीर असंही म्हणाले, की 2021पासून कोविड लसीकरणानंतर जगभरात टीटीएसची अनेक प्रकरणं घडली आहेत. हे खुलासे नवे नाहीत. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की टीटीएस हा विकार 100 वर्षांपासून आपल्याला माहिती आहे. 1924 साली पहिल्यांदा या विकाराची नोंद झाली होती. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की कोविड लसीकरणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो; मात्र ती जोखीम खूप कमी आहे. कार्डिअॅक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका येण्यामागे लसीकरणाचं कारण असण्याची शक्यता नगण्य आहे. भारतासह अन्य अनेक देशांतल्या वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झालं आहे. कोविडचा संसर्ग झाल्यास रक्ताच्या गुठळ्या बनण्याचा धोका वाढतो. तो कोविड लसीकरणाच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. टीटीएस हा विकार एन्फ्लुएंझा, न्यूमोकोकल, एच वन एन वन, रेबीज आदी विकारांच्या लसीकरणामुळेही झाल्याच्या नोंदी आहेत, असंही डॉ. सुधीर यांनी सांगितलं. कोविड लशींची तुलना करण्यासाठी पुरेसा डेटा नसल्याचंही ते म्हणाले. डॉ. जयदेवन यांनी सांगितलं, की कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लशी प्रभावी आहेत. प्रत्येक लस आणि उपचारांचे काही ना काही साइफ इफेक्ट्स असतात. भारतात लस घेतलेले कोट्यवधी नागरिक जिवंत आहेत आणि व्यवस्थित आहेत. लशीचा वापर झाला नसता, तर अनेक जण आज जिवंत असले नसते.