MUMBAI AIRPORT : बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेनं मुंबई विमानतळावर खळबळ

Bomb hoax at Mumbai Airport : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका महिला प्रवाशानं आपल्या सामानात बॉम्ब ठेवल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर ही अफवा असल्याचं आढळून आलं. त्यामुळं सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाकडं अतिरिक्त सामान होतं. त्यासाठी तिच्याकडं जादा पैसे मागण्यात आले. महिलेनं जादा पैसे देण्यास नकार दिला आणि आपल्याकडच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा तिनं केला. त्यामुळं तिथली यंत्रणा सतर्क झाली. या गोष्टीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेचच तिच्या बॅगांची तपासणी केली मात्र त्यात काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही.

या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध भादंवि कलम ३३६ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि संबंधित तिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला.

Mumbai Crime : चप्पल अन् चालण्याच्या लकबीवरून मोबाइल चोर जाळ्यात; मुंबई पोलिसांची कामगिरी

2023-06-01T08:54:49Z dg43tfdfdgfd