MHADA LOTTERY 2024 UPDATE : 8 ऑक्टोबरला जाहीर होणार म्हाडा लॉटरी; कधी मिळणार घरांचा ताबा? महत्त्वाची UPDATE जाणून घ्या
Mhada Lottery 2024 Update : मुंबईत हक्काचं आणि आप कमाईतून घेतलेलं, स्वत:चं असं घर असावं ही अनेकांचीच इच्छा असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी मदतीला येते ते म्हणजे म्हाडा. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या वतीने आजवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विविध भूखंडांवर गृहसंकुले उभारत नागरिकांच्या घरांची गरज पूर्ण करण्यात आली. यंदा अवघ्या काही दिवसांतच म्हाडाची सोडत जाहीर होणार आहे. विजेत्यांच्या नावांची यादी या सोडतीमध्ये जारी केली जाणार असली तरीही काहीशी चिंता वाढवणारी बाबही नुकतीच समोर आली आहे. (Mumbai MHADA Lottery 2024 Update)
काही काळ प्रतिक्षाच करावी लागणार
आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच म्हाडाची सोडत जाहीर करत इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. म्हाडाकडून काही त्रुटींमुळे आता सोडतीमध्ये विजयी ठरलेल्यांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण सोडतीमध्ये विजय मिळाला तरी विजेत्यांना घराचा ताबा मिळण्यासाठी काही काळ प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
MHADA Lottery 2024: कोकण मंडळाकडून तब्बल 8000 घरांसाठी 3 आणि 8 ऑक्टोबरला लॉटरी
घरांचे पझेशन लांबणीवर पडणार
याआधीच्या सोडतीमध्ये म्हाडाने तयार स्थितीतील घरे सोडतीमध्ये समाविष्ट केली होती. ज्यामुळे विजेत्यांची नावे जाहीर होताच सदर व्यक्तींकडे घरांचा ताबा सुपूर्द करण्यात येऊ शकेल. दरम्यान 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या म्हाडाच्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली घरे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. तर, काही इमारतींना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (ओसी) मिळालेले नाही यामुळे घरांचे पझेशन लांबणीवर पडणार हे स्पष्ट होते आहे.
काही घरे अद्यापही पूर्णपणे तयार नाहीत
म्हाडाच्या या सोडतीमध्ये यंदा 2030 घरांची जाहिरात करण्यात प्रसिद्ध करण्यात आली. ज्यापैकी 1500 घरे अद्यापही पूर्णपणे तयार नसल्याचे सांगितलं जात आहे, त्यामुळे विजेत्यांना घराची चावी मिळण्यासाठी आणखी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तब्बल 1.13 लाख अर्ज
सूत्रांच्या माहितीनुसार म्हाडाच्या या सोडतीला इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. 2030 घरांसाठी म्हाडाचे तब्बल 1.13 लाख अर्ज करण्यात आले होते. त्यामुळे आता यातून कोणाच्या नावे घराची मालकी जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 7000 घरांसाठी जाहिरात, वाचा सोडत कधी निघणार
OC असणाऱ्याच घरांचा समावेश सोडतीमध्ये करण्याचा निर्णय पण...
म्हाडाने मागील काही वर्षांमध्ये जारी केलेल्या सोडतींमध्ये काही विजेत्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते. यामुळेच म्हाडालाही टीकेचं धनी व्हावे लागले होते, यानंतर म्हाडाने OC असणाऱ्याच घरांचा समावेश सोडतीमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. पण, यंदा आगामी निवडणुकांच्या धामधुमीमुळे मतदारांना आकर्षित करण्याच्या हेतूने सत्ताधाऱ्यांकडून सोडत प्रक्रियाही निर्धारित वेळेआधीच जाहीर करण्यात आल्याचे म्हटले गेले.
सर्व घरांची कामे लवकरच पूर्ण होणार
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार सोडतीतील ज्या घरांचे काम अद्यापही अपूर्ण आहे, त्या सर्व घरांची कामे येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून विजेत्यांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यामुळे आता घराची चावी कधी हातात येते, याचीच प्रतीक्षा काही विजेत्यांना असेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
2024-10-02T08:02:28Z dg43tfdfdgfd