Trending:


Amitesh Kumar Pune CP PC : आयुक्तांकडून पुणे अपघात प्रकरणाबाबत मोठा खुलासा | ABP Majha

Amitesh Kumar Pune CP PC : आयुक्तांकडून पुणे अपघात प्रकरणाबाबत मोठा खुलासा | ABP Majha पुणे: गेल्या आठडाभरात पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या (Pune Porsche Car Accident)अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पुण्यातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. याच अग्रवाल कुटुंबातील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Agrawal) यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी (Gangaram Pujari) असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रकार परिषदेत अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या चालकाला कसे धमकावले, याबाबतचा सविस्तर तपशील सांगितला. चालक आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर आरोपींनी गंगाराम पुजारी याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकावर आणला. तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे आम्ही तुला गिफ्ट देऊ, असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम पुजारीला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. आम्ही तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.


अंतर्बाह्य भारतीय!

प्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांना नुकतीच साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. एका ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याचा हा मुलगा. भारतात जन्मलेल्या आणि वयाच्या ९०व्या वर्षीही लिहित्या असलेल्या अंतर्बाह्य भारतीय लेखकाच्या कारकीर्दीचा हा आढावा...


Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू

Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू नांदेड जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली. मध्यरात्री ही चोरी झाली . बारड भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे .. रात्री चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरून नेली . घटना स्थळी मोठी दोरी आणि एक पोत पोलीसांना आढळलं. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडला.त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावने अवघड झाले . एटीएम मशिन मध्ये रककम किती होती याची अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणात थेट एटीएम मशिनच पळवून नेल्यामुळे या प्रकरणाची चर्चा मात्र तुफान होते आहे. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


मुंबई शिक्षक मतदारसंघात इंडिया आघाडीत फूट?

?


TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये आगीचं तांडव..३० जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश... पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आरोपीच्या वडील आणि आजोबांकडून ड्रायव्हरला गोवण्याचा प्रयत्न... सुरेंद्र अगरवालला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी...विशाल अगरवालची अडचण वाढली... पुणे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सुरेंद्र अगरवाल यांचं ड्रायव्हरसोबत चॅटिंग.. सुरेंद्र अगरवाल यांच्याकडून ड्रायव्हरला पैशांचे आमिष, गुन्हे शाखेच्या तपासात उघड डोंबिवली स्फोटात आतापर्यंत तीन कंपन्यांमधून १२ कामगार बेपत्ता, तर मृतांची संख्या दहावर, अद्याप ७ मृतदेहांची ओळख पटवणं बाकी. मालेगावमधील कंधाने रोडवरील पेट्रोल पंपावर गोळीबार... दोन हल्लेखोरांकडून पैशांची मागणी.. कामगाराचा मोबाईल हिसकावून चोरट्यांचा पोबारा राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं...मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण...तर धुळ्यात ८ ते ९ दिवसांनी पाणीपुरवठा.. नागरिकांचे प्रचंड हाल बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज... पश्चिम बंगालसह ओडीशामध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात


Ghatkopar Hoarding Collapsed । घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी Bhavesh Bhinde कोर्टात हजार करणार

Ghatkopar Hoarding Collapsed. Ghatkopar hoarding incident accused Bhavesh Bhinde will pay thousand in court


Gujarat Game Zone Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

Gujarat Game Zone Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू Rajkot TRP Game Zone Fire Update: नवी दिल्ली : गुजरातच्या (Gujrat) राजकोटमध्ये (Rajkot) शनिवारी (25 मे 2024) टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत 32 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राजकोटमधील गेम झोन हे गर्दीचं ठिकाण असल्यानं आग लागली त्यावेळी गर्दी होती. त्यामुळे अनेकजण होरपळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटना प्रकरणी एसआयटी नेमली जाणार असून चौकशी केली जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात माहिती दिली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.


IMD Alert Bengal Remal Cyclone | बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ धडकणार;. समुद्र किनारी अलर्ट जारी

IMD Alert Bengal Remal Cyclone


Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ (Mumbai Graduate Constituency Election) हा परंपरेने शिवसेनेची जागा असून आपण या ठिकाणाहून इच्छुक असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांनी केलं. आपण या आधीही विधानपरिषदेवर होतो, त्यामुळे ही जागा महायुतीतील शिवसेनेने लढवावी असा आपला आग्रह असल्याचंही दीपक सावंत म्हणाले. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून या आधीच अनिल परब (Anil Parab) यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे....


Reaction On Uddhav Thackeray : लंडनचे नाले, आरोपांचे शोले; उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून महायुतीचा निशाणा

Reaction On Uddhav Thackeray : लंडनचे नाले, आरोपांचे शोले; उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून महायुतीचा निशाणा लंडन दौैऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केलीय...मी लंडनला जाऊ शकत नाही, मुख्यमंत्री असल्यानं मला राज्यात काम करावंच लागतं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.. तर उद्धव ठाकरे आता लंडनचे नाले पाहतात का असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केलाय.. मुख्यमंत्री आणि आशिष शेलारांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या सुनील राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चोरलेले आमदार सांभाळण्यासाठी शिंदेंना वर्षावर बसावं लागतं असा टोला सुनील राऊत यांनी लगावला.. मुंबईत महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना सुुरुवात झाली.. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला तर आज आशिष शेलार यांनी ग्राऊंडवर जाऊन नालेसफाईची पाहणी केली..यावेळी आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर टीका केली..उद्धव ठाकरे आता लंडनचे नाले पाहतात का असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केलाय.. तर आशिष शेलारांच्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार पलटवार केलाय.. मुख्यमंत्री आणि आशिष शेलारांमध्ये वाद दिसतोय. तसंच महायुतीत श्रेयवादाची लढाई दिसत असल्याचंही अनिल परब यांनी म्हटलंय.


टीआरपी गेम झोनमध्ये भीषण अग्नितांडव; 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेक जण लहान मुलं आणि महिला आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये ही आग लागली आहे. हा गेम झोन एका मॉलमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आतमध्ये आणखी काही मुलं अडकल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग एवढी भीषण...


बहार विशेष : मैत्रीचे डावे वळण

युक्रेन युद्धानंतरच्या काळात रशिया आणि चीन या अमेरिकेच्या दोन शत्रूंमधील संबंध कमालीचे घनिष्ट होत गेले. रशिया-चीन मैत्रीचा पाया अमेरिकाविरोधावर आधारलेला आहेच; पण त्याचबरोबरीने बदलत्या काळात या देशांचे आर्थिक परस्परावलंबित्वही वाढत चालले असून, मैत्री ही त्यांची गरज बनली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या अलीकडेच पार पडलेल्या चीन दौर्‍याकडे पाहावे लागेल. शीतयुद्धोत्तर काळात …


Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 25 May 2024

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 25 May 2024 विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांची घोषणा, मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब, तर शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर. ही शिवसैनिकांची शिवसेना, पक्षाची पकड अतिशय घट्ट आहे, विजयी होणार आणि पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार, अनिल परबांना विश्वास. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरे, तर मुंबईसाठी दीपक सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता, शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरु, दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार. येत्या सोमवारी एसएससी बोर्डाचा निकाल, २७ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होईल, बोर्डाच्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला आजपासून सुरुवात, १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार. मुंबई महानगर परिसरातील १ हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात, काल पहिल्याच दिवशी तब्बल २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून पहिल्या भागातील अर्ज दाखल, एकूण दोन भागांत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार. बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार, २७ मे ते ७ जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल, जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होणार.


Water Shortage : चिखली गावात हंडाभर पाण्यासाठी होतेय रात्रभर जागरण

पेठ, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा (सुरगाणे ) अंतर्गत येत असलेल्या चिखली या गावात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या दोन विहिरी आहेत. मात्र, त्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यातील एका विहिरीतील झऱ्यात २० मिनिटांनंतर हंडाभर पाण्यासाठी जमा हाेत असल्याने रात्र जागून बॅटरीच्या प्रकाशात …


NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत कोणत्या पदांवर भरती होणार आहे याची माहिती नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.


Dombivli MIDC Blast News: स्फोटानंतर भरत जयस्वाल बेपत्ता;पोलिसांकडून नातेवाईकांवर अरेरावी ABP Majha

Dombivili MIDC Blast News: स्फोटानंतर भरत जयस्वाल बेपत्ता;पोलिसांकडून नातेवाईकांवर अरेरावी ABP Majha डोंबिवली येथे झालेल्या औद्योगिक स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला मात्र अजूनही सहा जणांची ओळख पटली नसून काही जणांचे तर केवळ अवशेष सापडल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण दोन कामगारांचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या कंपनीच्या शेजारीच दिवसरात्र वाट बघतायत. दुर्दैवाची बाब म्हणजे या नातेवाईकांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याच्या ऐवजी पोलिसांकडून काठीचे फटके खावे लागत आहेत.पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि त्यांची टीम प्रसारमाध्यमांशी देखील अशाच प्रकारे वागणूक करताना दिसतायत. या स्फोटात भरत जयस्वाल बेपत्ता झालेत. भरत जयस्वाल पंधरा दिवसांपूर्वीच अनुदान कंपनीत कामाला लागले होते, परवा झालेल्या स्फोटानंतर ते अजूनही सापडले नाहीत असा दावा त्यांच्या भावाने केला आहे.


Nashik IT Raid on Jewelers : सराफा व्यावसायिकावर छापा, 30 तासांच्या कारवाईत सापडली 27 कोटींची रोकड

Nashik IT Raid on Jewelers : सराफा व्यावसायिकावर छापा, 30 तासांच्या कारवाईत सापडली 27 कोटींची रोकड नाशिक : गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) चांगलाच सक्रीय झाला आहे. या विभागाने नुकतेच नांदेडमध्ये मोठी छापेमारी (Nanded IT Raid) केली होती. या छापेमारीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. येथे एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करून प्राप्तिकर विभागाने (IT Raid) तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमुळे सध्या नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारवाईला लागले तब्बल 30 तास ही कारवाई करताना नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी एकूण 26 कोटींची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले आहेत. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाला एकूण सात कार बोलवाव्या लागल्या. सलग 30 तास ही कारवाई चालू होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले होते. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.


घुसखोर जाहले उदंड!

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात वास्तव्य करून असलेल्या दोन बांगलादेशी महिला मिळून आल्यावर त्याचा फार मोठ्या प्रमाणात गवगवा झाला; पण या दोन महिला म्हणजे केवळ एक ‘राई’ म्हणावी लागेल. कारण राई-राई करीत राज्यात आता घुसखोरांचा एक भला मोठा ‘पर्वतच’ उभा राहिला आहे. पण, कोणत्याच शासकीय यंत्रणेला त्याचे गांभीर्य असलेले दिसत नाही. भविष्यात हेच घुसखोर शिरजोर झाल्यास नवल …


स्पर्धा परीक्षेत अपयश, पण तो खचला नाही...! गावी गेला अन् शेतीतून घेतलं लाखोंचं उत्पन्न

Hanuman Bhoyar sucess story : आयुष्यातील कमवती 10 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा घरी पुन्हा मोकळ्या हाताने जावा लागतं, तेव्हा नाकार्तेपणाची भावना जगणं तरुणांसाठी खूप अवघड असतं. मात्र, एका तरुणाने शेतीच्या माध्यमातून स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलंय.


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36...


Surendra Agarwal Special Report : कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अगरवालला अटक का?

Surendra Agarwal Special Report : कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अगरवालला अटक का? Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अगरवाल याने त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं. तसेच सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या आधी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे सुरेंद्र अगरवालला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.


Pune Hit And Run Case: गुन्हाच्या तपासासाठी पोलिसांकडून रिक्रिएशन

Pune Hit And Run Case: Recreation by police to investigate the crime


दहशतीच्या सावटाखाली फुललेली अभिव्यक्ती

2024 Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी इराणचे दिग्दर्शक मोहम्मद रसूलोफ यांच्या ‘द सीड ऑफ द सेक्रेड फिग’ या चित्रपटाचा प्रिमिअर होणार आहे. या महोत्सवाला ते उपस्थित राहू नयेत, अशी व्यवस्था इराणमधील सरकार करू पाहात होते. परंतु रसूलोफ यांनी इराणमधून चुपचाप ‘पलायन’ केले आणि आपण युरोपच्या आश्रयाला आल्याचे जाहीर केले.


लोकशाहीचे पायदळ…

भारतासारख्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या, प्रचंड आकाराच्या, प्रचंड लोकसंख्येच्या देशात हा उत्सव साजरा होतो तेव्हा त्यासाठी तेवढ्याच प्रमाणात मनुष्यबळही लागते.


जगणं प्रश्नांकित करणारी कादंबरी

शैला मावजो यांनी केवळ कोकणीतीलच नव्हे तर भारतीय साहित्यातील महत्त्वाची कादंबरी मराठीमध्ये आणून मराठी साहित्याला मोलाचे योगदान दिले आहे. ही कादंबरी वाचताना कुठेही ती मुळात परभाषेत लिहिली गेली आहे, असे जराही वाटत नाही, हेच या अनुवादाचे यश आहे.


जळगावात उष्माघाताने 63 शेळ्यांच्या मृत्यू

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथे 63 मेंढ्या उष्माघाताने मरण पावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत महिती दिली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन निघावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच दुपारच्या वेळेस तापमान हे 45 ते 47 अंशवर राहते. त्यामुळे …


अर्थकारण : परदेशस्थांचा आर्थिक आधार

गेल्या काही वर्षांत भारतातून शिक्षण, रोजगार आदी कारणांमुळे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर परदेशातून मायदेशी येणारा पैशाचा ओघही वाढतो आहे. यातील मोठा वाटा आखाती देशातून येतो आणि तेथे भारतीय उत्पादन, ठोक, सुरक्षा, वाहतूक तसेच निम्नकुशल उद्योगांत काम करतात. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या जागतिक स्थलांतर अहवाल-2024 ने जारी केलेले आकडे संशोधकांना, धोरणकर्त्यांना, एवढेच …


Heat Wave: जळगावात काकोडमध्ये उष्माघातानं मेंढ्या दगावल्या

Hit Wave Sheep died due to heat stroke in Kakod in Jalgaon


पडझडीचा नवा अंक

रीडर्स डायजेस्ट बंद पडण्याचे जाहीर झाल्यावर ब्रिटनमध्येही अनेकांना धक्का बसला. आठवणींचे कढ आले. आपले समाजजीवन दरिद्री होण्यातली ही एक पायरी आहे, हे अनेकांनी जाणले. ‘द गार्डियन’ने ही लोकभावना ओळखली आणि वाचकांना ‘तुमच्या रीडर्स डायजेस्ट’च्या आठवणी कळवा, असे आवाहन केले. मग पाऊस पडू लागला. ८६ वर्षांच्या नात्याला ब्रिटिश वाचक सध्या असा निरोप देत आहेत.


Delhi Baby Care Center Fire | दिल्लीत बेबी केअर सेंटरला भीषण आग; होरपळून 6 चिमुकल्यांचा मृत्यू

Delhi Baby Care Center Fire


Rajinikanth : रजनीकांत यांना मिळाला गोल्डन व्हिसा; थलायवाला UAE सरकारची खास भेट

Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांना UAE सरकारने गोल्डन व्हिसा (Golden Visa) दिला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. रजनीकांत नुकतेच अबुधाबीला गेले होते. त्यावेळी त्यांना गोल्डन व्हिसा देत गौरव करण्यात आला. याबद्दल रजनीकांत यांनी UAE सरकार आणि लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली यांचे आभार मानले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर...


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


Tadoba National Park : व्याघ्र पर्यटनाला सुगीचे दिवस; राज्यात ताडोबा-अंधारी प्रकल्प पुन्हा एकदा अव्वल

Chandrapur News : पर्यटनाच्या दृष्टीने जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेले; घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे.


Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महापालिका अॅक्टिव्ह मोडवर; पब, रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई

पुणे : पुणे पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Accident) पुण्यातील बार आणि रुफ टॉप हॉटेलवर (Pune Pub and Bar) कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता पिंपरी-चिंडवड महापालिकादेखील खडबडून जागी झाली झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आता पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड भागात रूफ टॉप हॉटेलवर हातोडा चालवला आहे. तसेच बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे. 9000...


Vidoe| तलावात 15 दिवस पुरेल एवढंच पाणी

Sambhajinagar Harsul Lake Water To Last Fifteen Days In Drought Situation


Shirdi Lok Sabha:शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित फॅक्टर ठरणार गेमचेंजर? स्थानिक पत्रकार काय म्हणतात?

Shirdi News: शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे तर मविआकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे वंचितनेही तगडा उमेदवार दिला आहे.


Pandharpur Vitthal Rukmini Mandir: बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... पुढील 500 वर्ष विठुराया आणि रुक्मिणी मातेला मेघडंबरीचा विसावा!

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: पंढरपूर : पंढरपपूरमधील (Pandharpur News) विठुरायाच्या मंदिराला (Vitthal Rukmini Mandir) 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम सध्या सुरु असताना आता देवाच्या दगडी गाभाऱ्यात नवीन मेघडंबरीमध्ये देव पुढील शेकडो वर्षांसाठी विसावणार आहे. मंदिर गाभाऱ्याचं काम करताना देवाच्या शेजारी बसवलेली पुरातन मेघडंबरी कुजून गेल्याचं समोर आलं होतं. यानंतर पुन्हा नव्यानं मेघडंबरी बनविण्याचा विषय आल्यावर वारकरी फडकरी संघाचे उपाध्यक्ष...


Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात गॅस चोरीच्या घटना काही नवीन नाही. आतापर्यंत (Pune gas cylinder Blast) अनेकदा अशा घटना समोर आल्या आहे. परिणामी या घटनांमुळे अनेकांना चापदेखील देण्यात आला आहे. मात्र तरीही गॅस चोरी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी...