Trending:


ABP Majha Headlines : 07 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 07 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स लालबागचा राजाची उत्साहात मिरवणूक, मुंबईकरांची तुफान गर्दी, तर मुंबईचा राजा चौपाटीकडे मार्गस्थ मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंगमधून पुष्पवृष्टीची ५५ वर्षांची परंपरा...यंदा एक हजार किलो फुलांची होणार उधळण...दीडशे ते दोनशे बाप्पांवर पुष्पवर्षाव... गिरगाव चौपाटीवर मोठ्या बाप्पांचं विसर्जन सुरू, तर छोट्या मूर्तींनाही पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप... पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन, तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ, बाप्पासमोर पारंपरिक वेशात केरळी वादकांचं सादरीकरण...तर कलाकारांचंही वादन नाशिकमध्ये रामकुंड परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांची गर्दी, शहरांत मानाच्या गणपतींची २१ चित्ररथांसह मिरवणूक... हरयाणातील कलाकारांचं तांडव नृत्य सोलापूर,नागपूर,कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुका सुरुवात, घरगुती बाप्पाचंही उत्साहात होत आहे विसर्जन... ज्यांना सर्वात जास्त गरज त्यांना बाप्पांनी सुबुद्धी द्यावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गणरायकडे मागणी...सागरवरच्या गणपतीचं कृत्रिम हौदात विसर्जन... महायुतीत समन्वयानं जागावाटप होतंय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास...अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा असते... युतीत शिंदे, अजितदादांना केवळ ४० ते ५० जागा मिळतील, संजय राऊतांचा दावा...स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढण्याचं दिलं आव्हान... राष्ट्रवादीत कोणतीही नाराजी नाही, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण...शिंदेंच्या शिवसेनेला महामंडळांवर संधी मिळाल्यानं राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा... अरविंद केजरीवालांनी दिला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री... सर्वोच्च न्यायालयाकडून बुलडोझर कारवाईला एक ऑक्टोबरपर्यंत स्थगिती...विशिष्ट धर्माच्या घरांची तोडफोड होत असल्याची जमियत उलेमा ए हिंदची याचिका...


Tulshi Baug Ganpati Visarjan : पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जन

Tulshi Baug Ganpati Visarjan : पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जन पुणे: पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन अतिशय संथ गतीनं सुरु आहे. विसर्जन (Ganapati Visarjan) मिरवणूक सुरू झाली त्या मंडईच्या टिळक पुतळ्यापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या बेलबाग चौकात पाचवा मानाचा गणपती पोहचायला पाच तास लागले आहेत. पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मिरवणूक बरोबर साडे दहा वाजता सुरु झाली. त्या पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग तासाभराच्या फरकाने दोनशे मीटर वर असणाऱ्या बेलबाग चौकात पोहचले. शेवटचा अर्थात पाचवा मानाचा गणपती असणारा केसरीवाडा साडे तीन वाजता बेलबाग चौकात पोहचला. तिकडे याच बेलबाग चौपातून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अलका चौकात अद्याप मानाचा पहिला कसबा गणपती ही पोहचलेला नाही. त्यामुळं यंदा ही पुण्यातील गणपती विसर्जनाच्या (Ganapati Visarjan) मिरवणुका किती तास चालणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्याआधी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड आपकडून केली जाईल.


Konkan Highway | कोकणच्या नव्या महामार्गाची रुपरेषा जाहीर

ठाणे : मुंबईहुन गोव्याला के वळ सहा तासांमध्ये १५० पर कि. मी वेगाने धावू शकणारा कोकणच्या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रुपरेषा राज्य रस्ते महाविकास मंडळाने जाहीर केली आहे. या महामार्गाची लांबी ३७६ कि.मी असून एकूण खर्च ६८,७२० कोटी येणार आहे. तसेच हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असून, दोन सर्व्हिस रोड असणार आहे. या महामार्गावर एकूण ४१ बोगदे ५१ मो...


Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला. ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अशी लढत वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीमध्ये गाठी भेटींना सुरुवात केली आहे. देशपांडे यांच्याकडून वरळीकरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण तापले आहे. जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सैनिकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते शिवसैनिक होते, पण आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. मात्र, यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे ठाण्यातील मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय ठाकरे ज्या कार्यलयात मेळावा घेणार होते, त्या कार्यालयातही मनसैनिक घुसले आणि त्यांनी राडा केला होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही.


Ganesh Immersion 2024 Arrangements : पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल

चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे.


शेवगावमधील 34 गावांची पैसेवारी जाहीर

शेवगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ३४ गावांची खरीप पिकाची नजर अंदाज आणेवारी पन्नास पैशांपुढे जाहीर झाली आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाली असतानाही आणेवारी चुकीची जाहीर केल्याचा आरोप होत आहे. तालुक्यात खरीप पिके असलेल्या शेवगाव, चापडगाव, बोधेगाव मंडळांतील ३४ गावांची २०२४-२०२५ मधील खरीप हंगामी पिकांची नजर अंदाज आणेवारी प्रशासनाने ५० पैशांपुढे जाहीर के...


Ajit Pawar Dagdushet Ganpati Pooja : अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा

Ajit Pawar Dagdushet Ganpati Pooja : अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा सगळ्या मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.. आताही यांनी त्यांची चांगली जबाबदारी पार पाडावी सगळ्यांंना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा सगळ्यांचीच इच्छा पुर्ण होते असं नाही मतदार राजा कोणाला निवडून देतो हे महत्वाचं


यंदाही ‘वर्षा ’ वरून बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण आलं आणि...शिंदे कुटुंबियांच्या आदरातिथ्याने भारावले मराठी कलाकार

celebs for Ganpati Darshan at Cm varsha bungalow: यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला अनेक बॉलिवूड तसंच मराठी कलाकारांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.


Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरली

Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरली


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आणि त्याचे परिणाम यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या दोन टप्प्यांबद्दल केलेले भाष्य महत्त्वाचं ठरतंय.


Sindhudurg Fort| किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ


राज्यात हत्तीरोगाचे रुग्ण वाढले

मुंबई : राज्यात हत्तीरोगाची रुग्णसंख्या वाढली असून चंद्रपूर आणि नागपूरसह सात जिल्ह्यांमध्ये या आजाराचा धोका सर्वाधिक आहे. हत्तीरोगमुक्त अभियान करण्याचे उद्दिष्ट केवळ स्वप्नच ठरत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून दोन वर्षात हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, त्याच व...


Ratnagiri news | कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ

कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ


Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन

Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात कसबा गणपती समोर बेलबाग चौकातील रमणबाग पथकाचे वादन सुरु


पुढारी अग्रलेख : केजरीवाल यांचा स्टंट

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आश्चर्यकारक निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत! काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या बॅनरखाली केजरीवाल यांनी नवी दिल्लीत ऐतिहासिक आंदोलन केले. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सोपवले. नंतर अण्णांनाच त्यांनी अडगळीत टाकले. राजकारणात जाऊ ...


Sassoon Hospital Pune: ससूनचे 'कसून' लेखापरीक्षण; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा निर्णय

Sassoon Hospital Pune: गैरव्यहार उघडकीस आल्याने प्रशासकीय खात्यातून यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लेखापरीक्षणातून गेल्या काही वर्षांतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असल्याने ससूनमधील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


Parelcha Maharaja Mumbai : मुंबईत परळच्या महाराजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी ABP MAJHA

जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू, दाखल्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत, तर जीआऱच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून सहाव्यांदा आमरण उपोषण, यंदा शेवटची संधी म्हणत फडणवीसांना इशारा, तर भुजबळांवरही साधला निशाणा राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देईन, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांत तक्रार,गायकवाड विधानावर ठाम शरद पवारांमुळे राज्याला जातीयवादाचा कॅन्सर, पडळकरांची पातळी सोडून टीका, तर शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या सेनेसाठी अपशब्द, मविआकडून दोघांचाही समाचार दिवाळीनंतर महाराष्ट्रात दोन टप्प्यात विधानसभेचा बार, अनौपचारिक गप्पांदरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती, तर महापालिकेच्या निवडणुका कधी? ठाकरेंच्या सेनेचा सवाल महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून परराज्यातील नेत्यांची फौज सज्ज, महाराष्ट्र पिंजून काढत हायकमांडला रिपोर्ट देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ मिळणार नाही का, राजकीय वर्तुळात चर्चा महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अदानी पॉवर पुरवणार राज्य सरकारला वीज, प्रक्रियेनुसारच टेंडर, आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर निर्यात शुल्कात कपात करूनही कांद्याचा वांदा कायम, जेएनपीटीच्या सिस्टिमध्ये बदल न झाल्याने शेकडो ट्रक कांद्याची निर्यात रखडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही फडणवीसांच्या गणरायासह मुंबईच्या प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप


Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात आज 'या' भागात पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra weather Update: राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार असल्याने हवामान विभागाने आज कोणत्याही जिल्ह्यांना पावसाचा कुठलाच अलर्ट जारी केलेला नाही.


Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय?

Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय? अपडेट पंढरपूर - मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेले विभागीय आयुक्त यांची आंदोलकांशी चर्चा सुरू. धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे धनगर बांधवांना भूमिका समजावून सांगत आहेत धनगर आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस , मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त पत्र घेऊन आंदोलकांच्या भेटीला दाखल, आंदोलकांशी चर्चा सुरू.. सोबत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित


Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk: स्वपक्षीय आमदारांमुळे भाजपला टेन्शन, पवारांच्या चमत्कारामुळे धास्ती; राज्यात हरियाणा पॅटर्न?

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk: लोकसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर आता भाजपनं विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पण आपल्याच नेत्यांमुळे भाजपची चिंता वाढली आहे.


MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल

पनवेल : एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला अपमानित करीत तक्रारी दाखल करीत असतानाच गृहमंत्री कार्यालयाकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एनआरआय पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दोषावर ...


Crime News | टाकळीभानच्या ट्रकचालकाचा बंगालमध्ये मारहाणीत मृत्यू

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ट्रकचालकाचा पश्चिम बंगालच्या खडकपूर येथे अपघाताच्या कारणावरून जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला आहे. तीन दिवसांनंतर मृतदेह टाकळीभान येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. येथील श्याम शंकर गणकवार (वय २९) टाकळीभान येथून ट्रक (एमएच १७-बीझेड ४५८२) मध्ये कांदा भरून पश्चिम बंगाल ...


गँगस्टर बिश्नोई टोळीतील 6 गुंडांना कळंगुटमध्ये अटक

पणजी : पंजाबमध्ये दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर खुनी हल्ला करून गोव्यात लपून बसलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील सहाजणांच्या मुसक्या आवळण्यात पंजाब पोलिसांना यश आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. पंजाब पोलिस त्या सहाही जणांना घेऊन सोमवारी सकाळी गोव्यातून पंजाबला रवाना झाले आहेत. गायक ए...


ganpati Visarjan 2024 : ठाणे, कल्याण, भिवंडीत वाहतुक बदल

अनंत चतुर्दशी निमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि भिवंडी शहरात शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Aadhar Card Update : लग्नानंतर आधारवरील नाव आणि पत्ता बदलायचाय? जाणून घ्या सोपी पद्धत

Aadhar Card Update : लग्नानंतर महिलांना आधार कार्डमध्ये बदल करायचे असल्यास जाणून घ्या सोपी पद्धत


NPS Vatsalya Scheme : केंद्र सरकारने लहान मुलांसाठी आणलेली NPS वात्सल्य योजना नेमकी काय आहे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.


BSNL जोमात इतर कंपन्या कोमात! ऑफिसमध्ये राहुनही फोनमध्ये चालेल घरातील WiFi

मुंबई : BSNL एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करणार आहे. ज्याद्वारे तुम्ही घरापासून दूर असलात तरीही फायबर कनेक्शनद्वारे हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. 'सर्वत्र' असे या प्रोजेक्टचं नाव असून या प्रोजेक्टने टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये क्रांती होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रोजेक्टची ट्रायल फेज पहिलेच पूर्ण झाली आहे. लवकरच ही सर्व्हिस केरळ सारख्या परिसरांमध्ये सुरु केली जाईल.लोक करताय नोंदणी BSNL जास्तीत जास्त लोकांना या सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित...


Cm Eknath Shinde Ganpati Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उथळसरचा राजा चरणी नतमस्तक ABP Majha

Ganesh Visarjan 2024 : घरोघरी, मंडळांत लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आज 10 दिवसांनी गणरायाचं विसर्जन होणार आहे. सनातन धर्मानुसार, अनंत चतुर्दशी (Ganesh Visarjan) तिथीला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आज विश्वकर्मा पूजा देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास धरतात आणि बाप्पाचं विसर्जन करतात. मात्र, गणपतीचं विसर्जन कराता काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठीच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात. गणेश विसर्जनाच्या दिवशी काय करु नये? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना योग्य दिशेची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये गणपतीचं मुख घराच्या दिशेने तर मूर्तीची पाठ घराच्या बाहेर असमं गरजेचं आहे. असं म्हणतात की, गणपतीची मूर्ती घेऊन जाताना जर पाठ घराच्या दिशेने असेल तर दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो.तसेच, घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. जर, गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही घरी बाप्पासाठी नैवेद्य तयार करत असाल तर नैवेद्यात लसूण किंवा कांद्याचा वापर करु नका. नैवेद्यात सात्विक भोजनच दाखवा. जर तुम्ही घरीच गणपती विसर्जन करणार असाल तर मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर विसर्जनाचं पाणी आणि मूर्तीच्या मातीला फेकून देऊ नका. विसर्जनाच्या पाण्याला तुम्ही झाडा-झुडुपांत टाकू शकता.तसेच, झाडाचं रोप लावताना तुम्ही मातीचा वापर करु शकता. गणेश विसर्जनाच्या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. तर, या दिवशी सात्विक भोजनाचं सेवन करावं. अन्यथा देव नाराज होऊ शकतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीला वेगाने पाण्यात प्रवाहित करु नका. तुळशीची पानं भगवान गणेशाला अर्पण करु नका. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही तुळशीचा नैवेद्य दाखवू नका. गणपतीला नैवेद्य दाखवताना चुकूनही या नैवेद्याचा सेवन करु नये. या दिवशी कोणाशीच वाद घालू नका तसेच कोणाचं मन दुखवू नका. धार्मिक मान्यतेनुसार, कोणत्याही शुभ समारंभाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करु नये.


सोलापूर : बाप्पाला आज निरोप

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर 11 दिवसांनी मंगळवारी सोलापूर शहरातील 1350 विविध मध्यवर्ती मंडळांकडून लाडक्या बाप्पाला वाजत गाजत, पारंपरिक लेझीम, झांज, ढोल वाजवून व डॉल्बीच्या तालावर थिरकून निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. शहरातील विविध नऊ मध्यवर्ती मंडळांकडून तयारी झाली आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने...


सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024 गणेशोत्सवाची आज सांगता... १० दिवसांचे गणराय निघणार गावाला... मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप पुण्यातल्या मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात, दगडशेठच्या गणपती ४ वाजता निघणार आणि ८ वाजता विसर्जित होणार... मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, विसर्जनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या, मध्यरात्री गणेश विसर्जनाहून परतणाऱ्या मुंबईकरांची सोय


Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September 2024

महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो-रिस्क धोरण, राज्याबाहेरचे ६० नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी... मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लीगल सेलची तक्रार, कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ


Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

अकोले : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच (Mahayuti) नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशाराच डॉ.किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे. डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ते पुढे म्हणाले की, मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या, शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे त्यांनी लहामटे यांनी म्हटलं आहे.


Lebanon Pager Explosion : लेबनॉन हादरलं! पेजर बॉम्बस्फोटात 8 ठार तर 2750 जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेबनॉनमध्ये अमेरिकेने घोषित केलेली दहशतवादी संघटना हिजबोलाला लक्ष्य करून हल्ला केला. मंगळवारी (दि.17) लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये एकाच वेळी शेकडो हॅन्डहेल्ड पेजरचा स्फोट झाल्याने 8 लोकांचा मृत्यू झाला. तर या घटनेत सुमारे 2 हजार 750 लोक जखमी झाले. या हल्ल्यात हिजबोला या दहशतवादी संघटनेचे सदस्य, इराणचे राजदूत आणि इतर प...


Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!

Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांच्यासाठी नाना पाटेकर स्वतः घेऊन आले जेवणाचं ताट जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू, दाखल्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत, तर जीआऱच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून सहाव्यांदा आमरण उपोषण, यंदा शेवटची संधी म्हणत फडणवीसांना इशारा, तर भुजबळांवरही साधला निशाणा राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देईन, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांत तक्रार,गायकवाड विधानावर ठाम शरद पवारांमुळे राज्याला जातीयवादाचा कॅन्सर, पडळकरांची पातळी सोडून टीका, तर शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या सेनेसाठी अपशब्द, मविआकडून दोघांचाही समाचार दिवाळीनंतर महाराष्ट्रात दोन टप्प्यात विधानसभेचा बार, अनौपचारिक गप्पांदरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती, तर महापालिकेच्या निवडणुका कधी? ठाकरेंच्या सेनेचा सवाल महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून परराज्यातील नेत्यांची फौज सज्ज, महाराष्ट्र पिंजून काढत हायकमांडला रिपोर्ट देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ मिळणार नाही का, राजकीय वर्तुळात चर्चा महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अदानी पॉवर पुरवणार राज्य सरकारला वीज, प्रक्रियेनुसारच टेंडर, आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर निर्यात शुल्कात कपात करूनही कांद्याचा वांदा कायम, जेएनपीटीच्या सिस्टिमध्ये बदल न झाल्याने शेकडो ट्रक कांद्याची निर्यात रखडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही फडणवीसांच्या गणरायासह मुंबईच्या प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप