Trending:


Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंनी कोण कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली ?

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंनी कोण कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली ? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झालेले आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या असूनही आम्हाला ओबीसीतून आरक्षण का दिले जात नाही. सगेसोरऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी का केली जात नाही, असे अनेक प्रश्न जरांगे यांनी केले आहेत. तसेच राज्यात मराठा समाजासह ब्राह्मण, मारवाडी, लोहार, मुस्लीम समाजातील लोकांच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनाही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. ते आज (23 जून) छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पाशा पटेल या मुस्लीम समाजाच्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे. सरकारी दरबारी मुस्लीम समाजाचीही कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मु्स्लिमांना कुणबी म्हणून आरक्षण द्यायला हवे. हे आरक्षण कसे दिले जात नाही, तेच मी बघतो. तुम्हाला कायद्याने चालायचे आहे ना. 1967 सालानंतर ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्या कोठेच नोंद नाही. तुम्ही यांना कोणत्या आधारावर 16 टक्के आरक्षण दिलं. आमच्या पाठीत खंजीर खुपसून, आमचं वाटोळं करून तुम्ही आरक्षण दिलं कसं?" असा सवाल जरांगे यांनी केला.


Laxman Hake OBC Reservation Protest : हाके, वाघमारे यांचं उपोषण स्थगित

जालना : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. काय म्हणाले लक्ष्मण हाके? बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावं. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या सरकारने आश्वासन दिलं आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे.


Throwback: बाळासाहेबांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही... मराठी अभिनेत्याच्या वडिलांचा हार्ट अटॅकनं झालेला मृत्यू

Balasaheb Thakre Death Incident: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानं मराठी माणूस पोरका झाल्याच्या भावना आजही व्यक्त होतात. त्यांच्या निधनानाचा धक्का अनेकांना सहन झाला नव्हता.


पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 43 हजार 605 शुभ्र (पांढरे) शिधापत्रिका असणार्‍या कुटुंबीयांना दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ त्यांना मिळेल. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन …


संविधान बदल आणि इतर खरीखोटी कथानके…

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १५-२० दिवस झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा रालोआचे सरकार स्थापन झाले आहे.


अभिजात मराठी

अभिजात मराठीच्या पुरस्कर्त्यांनी केवळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले व मराठी भाषा व भाषा याचाच उद्घोष सुरू ठेवला. मात्र मराठी राज्य भाषेचे, स्टेट लँग्वेजचे घटनाकारांना कोणते कार्यक्षेत्र अभिप्रेत आहे, याकडे दुर्लक्ष केले.


Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 23 जून 2024

Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 23 जून 2024 ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेत गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटलांकडून इन्कार अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर सुषमा अंधारेंचे आरोप शिंदेंच्या शिवसेनेने फेटाळले.. नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे आज होणारी नीट पीजी परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अचानक रद्द. , लवकरच नवी तारीख जाहीर होणार नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे


यूपी पोलिस पेपरफुटीचा आरोपी रवी अत्री याचा नीट पेपरफुटी प्रकरणातही सहभाग

नीट पेपरफुटीच्या तपासात रवी अत्री हे नावही समोर येत आहे. आधीच घडलेल्या उत्तर प्रदेश पोलिस भरती पेपरफुटीतही तो आरोपी आहे. मेरठ जेलमध्ये सध्या तो आहे. इथूनच त्यानेही नीट पेपरफुटीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. रवी अत्री हा नीट पेपरफुटीतील सॉल्व्हर गँगचा (पेपर सोडविणारी टोळी) म्होरक्या आहे. तो नोएडातील नीमका गावचा आहे. पेपर फोडणार्‍यांना सॉल्व्हर टोळीपर्यंत …


ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.


Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले? पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे... काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं.. ज्याने तो प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे.. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.. ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे... काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे... पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे... ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे... त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे... सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी जुन्या वैमानस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे... मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का याचाही शोध घेतला जात आहे... यापुढे देखील असे प्रयत्न होऊ शकतात... पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर तो पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमजुत निर्माण करून दंगल सदृश्य स्थिती निर्माण करायची असं यापुढेही होऊ शकतं.. म्हणून गृह विभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे... पोलीस महासंचालक आणि एसआयडी ला वस्तुस्थिती सांगितली आहे... काही राजकीय नेत्यांनी काल तो पत्र ट्विट केलंय.. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल... कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आलाय...


Dharavi Redevelopment : मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार

Dharavi Project Adani Redevelop : धारावी झोपडपट्टीचा अदानी ग्रुप केवळ पुनर्विकास करणार असून ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित होणार आहे. अदानी केवळ विकासक म्हणून काम पाहतील.


Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले... पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


हिजाबबंदीविरोधात विद्यार्थिनी हायकोर्टात

मुंबई : पुढारी वार्ताहर : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाबबंदीमुळे वाद निर्माण झाला आहे. या हिजाबबंदीच्या विरोधात नऊ विद्यार्थिनीनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागील वर्षांपासून महाविद्यालयात सुरू असलेल्या हिजाबबंदीच्या वादावर पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी आचार्य मराठे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने …


COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

COEP Pune recruitment 2024 : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत कोणत्या पदांसाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


GST Council meet: प्लॅटफॉर्म तिकिटासह रेल्वेच्या सेवांवरील करात सूट, GST परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय, पाहा यादी

GST Council meet: तब्बल आठ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. शेवटची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाहा यादी


क्रीडा : पाकिस्तानच्या क्रिकेटला घरघर

निवड समितीतील वशिलेबाजी, खेळाडूंमधील गटबाजी, फिटनेसचा अभाव, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप, अशा अनेक कारणांमुळे पाकिस्तानचे क्रिकेट रसातळाला चालले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तर पाक संघाला बाद फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या दारुण पराभवाची बीजे तिथल्या भोंगळ व्यवस्थेत लपली आहेत. संपन्न भूतकाळ आणि अस्वस्थ करणारे वर्तमान अशी पाकिस्तानच्या क्रिकेट …


Intercity Express And Deccan Express: पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस इतक्या दिवसांसाठी बंद

Pune-Mumbai Railway: पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन एक्स्प्रेस गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.


Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या श्री रामकृष्ण नेत्रालय या रुग्णालयाचे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज ठाकरे बोलत आहेत देशपांडे यांच्या दुसरया हाॅस्पिटलचं माझा हस्ते उद्घाटन होतयं डोळे दाखवायच्या अत्याधुनिकयंत्र पाहून थक्क झालो सध्या महाराष्ट्राची डोळे उघडण्याची गरज आहे त्याच्यासाठी काही...


Mumbai Sion Flyover: मुंबईकरांसाठी कामाची बातमी: शीव उड्डाणपूल बंद, कारण...

Mumbai Sion Flyover: आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरला आहे. अहवालातील शिफारशीनुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात येईल.


Amol Mitkari On Ajit Pawar : महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ?

Amol Mitkari On Ajit Pawar : महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ? राज्याच्या राजकारणातून एक अतिशय मोठी बातमी आहेय..... अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीये. अकोला येथे 'एबीपी माझा'शी साधलेल्या 'एक्सक्लूझिव्ह' संवादादरम्यान त्यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केलीये. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोये. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. आमदार मिटकरींशी 'एक्सक्लूझिव्ह' संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...


Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात

Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात नीट पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात... एक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत.... दोघे ही जिल्हा परिषद शाळेत आहेत शिक्षक...दोघांची कसून चौकशी सुरू वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले.


CM Shinde On Nilesh Lanke : मुख्यमंत्री शिंदेंची 'लंके'च्या विजयावर टीका, त्यांना 'असुरी' आनंद घेऊ द्या

cm eknath shinde on nilesh lanke : सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आज लोणी येथे शिक्षक आणि संस्थाचालकांच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, ''विखे कुटुंबाला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यांना (नीलेश लंके) तात्पुरता आणि असुरी आनंद घेऊ द्या. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.त्यामुळे सुजय तुम्ही नाराज...


Deer Spotted in Bhandara : कारसमोरून हरणाच्या कळपानं उड्या मारत ओलांडला रस्ता

Deer Spotted in Bhandara : कारसमोरून हरणाच्या कळपानं उड्या मारत ओलांडला रस्ता हरणाच्या कळपानं टुणुक टुणुक उड्या मारत ओलांडला रस्ता मनोज मदान यांनी कळपांना केलं कॅमेरात कैद जंगल, नद्यांच्या आणि तलावांच्या निसर्ग सनिध्यांनी नटलेल्या भंडारा जिल्ह्यातून सातपुडा पर्वताच्या रांगा गेल्या आहेत. जंगलात राहणारं हरणाचं कळप आता नागरी वस्तींकडं येताना बघायला मिळत आहे. सध्या खरीप हंगाम असून जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं आलेल्या हरणांच्या एका कळपाचा जांब ते आंधळगाव या मार्गावर मुक्त संचार बघायला मिळाला. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वन्यजीव प्रेमी मनोज मदाम यांनी हरणांच्या कडपांचा टुणुक टुणुक उड्या मारून मार्ग ओलांडतानाचा व्हिडिओ त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. सध्या खरीप हंगाम असून जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं आलेल्या हरणांच्या एका कळपाचा जांब ते आंधळगाव या मार्गावर मुक्त संचार बघायला मिळाला.


पुणे Porsche अपघात प्रकरणाची मोठी अपडेट, विशाल अग्रवालला जामीन, पण…

चंद्रकांत फुंदे, पुणे: पोर्शे अपघात प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अल्पवयीन मुलान पोर्शे कारने दोन जणांना उडवलं होतं आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण खूप चिघळलं. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.विशाल अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अगरवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.विशाल अगरवलाच्या अल्पवयीन...


Pune Drug Case Update: तरूण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हीडीओ,ड्रग्ज सापडलेल्या हॉटेलबाहेरून आढावा

Pune Drug Case Update: तरूण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हीडीओ,ड्रग्ज सापडलेल्या हॉटेलबाहेरून आढावा जे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं... त्या पुण्याची आता ड्रग्जचं माहेरघर अशी ओळख बनतेय की काय अशी भीती वाटू लागलीय... कारण ललित पाटील, पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नवीन ड्रग्ज प्रकरण समोर आलंय.. पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय.. लिक्विड लाऊंज हॉटेलमधल्या पार्टीत काही तरुण ड्रग्जचं सेवन करताना आढळून आले आहेत.. तर अनेक अल्पवयीन मुलं दारुच्या नशेत असल्याचंही समोर आलंय.. मध्यरात्री ३ वाजल्यानंतरचे हे व्हिडीओ आहेत.. त्यामुळं पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळाही हॉटेलचालक पाळत नाहीत हे पुन्हा एकदा समोर आलंय.. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय.. हॉटेलच्या सीसीटीव्हीचीही पोलिसांनी तपासणी सुरु केलीय..


Rahul Gandhi Resignation : ..तर राहुल गांधींची दोन्ही जागांवरील निवड होईल रद्द,निर्णय घेण्यासाठी उरले फक्त २४ तास

४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. ते विजयी झालेल्या रायबरेली आणि वायनाड या दोन महत्वपूर्ण मतदारसंघांपैकी त्यांना निकाल जाहीर झाल्याच्या १४ दिवसांमध्ये एका मतदारसंघांतून राजीनामा देणे बंधनकारक आहे.त्यामूळे राहुल गांधींकडे आपला निर्णय घेण्यासाठी फक्त २४ तास उरले आहेत.


तवायफनामा एक गाथा

तब्बल पंधरा वर्षं संशोधन... मौखिक इतिहासाचे आणि दस्तावेजांचे उत्खनन करून सबा दीवान यांनी ‘तवायफनामा’ हा ग्रंथ साकारला


Supriya Sule Vs Murlidhar Mohol : सुप्रिया सुळे-मुरलीधर मोहोळ ड्रग्ज प्रकरणावरुन आमनेसामने

Supriya Sule Vs Murlidhar Mohol : सुप्रिया सुळे-मुरलीधर मोहोळ ड्रग्ज प्रकरणावरुन आमनेसामने Pune Drugs News : पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्जविक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आलाय. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतेय